अभिनेत्री रुपाली भोसले ही सध्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेमुळे चर्चेत आहे. या मालिकेत तिने साकारलेली संजना ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. पूर्वी संजना ही भूमिका अभिनेत्री दिपाली पानसरेने साकारली होती. पण काही काळानंतर दिपालीने प्रेक्षकांचा निरोप घेतला आणि तिच्या जागी रुपालीने ‘आई कुठे काय करते’ मालिकेत एन्ट्री घेतली. दिपाली प्रमाणे तितक्याच ताकदीने रुपाली ही भूमिका पेलेलं का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. पण रुपालीने संजना ही भूमिका उत्कृष्टरित्या साकारली आणि यासाठी तिला सर्वोकृष्ट खलनायिकेचा देखील पुरस्कार मिळाला आहे. मात्र खलनायिकेची भूमिका करताना अनेक अभिनेत्रींना समाजात वावरताना वाईट अनुभव येतात. याच विषयी रुपालीला विचारलं असताना तिने आतापर्यंत प्रेक्षकांचा आलेला अनुभव सांगितला.

हेही वाचा – “अनिरुद्धच्या भूमिकेसाठी मी उत्साही नव्हतो”, मिलिंद गवळींनी सांगितलं ‘आई कुठे काय करते’ मालिका स्वीकारण्यामागचं खरं कारण, म्हणाले…

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
reactions of students participated in loksatta lokankika competition zws
म्हणूनच लोकसत्ता लोकांकिका इतर स्पर्धांपेक्षा खूप आगळीवेगळी ठरते; स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी

हेही वाचा – ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर डान्स रील्समुळे ट्रोल; अभिनेत्रीने सुनावले खडे बोल

नुकतेच ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील मिलिंद गवळी आणि रुपाली भोसले ‘लोकसत्ता ९९९’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी रुपालीशी संवाद साधताना तिने प्रेक्षकांच्या आलेल्या अनुभवाविषयी सांगितलं. ती म्हणाली, “मला खूप वाटलं होतं की, कोणीतरी येऊन म्हणले, काय करते तू? तुला काही वाटतं का? पण असं अजिबात झालं नाही. पहिल्या दिवसांपासून मला जे काही प्रेम मिळालं आहे, ते वेगळ्याच पातळीच मिळाल आहे. प्रेक्षकांना संजना खूप छान वाटली आहे. संजनाची भूमिका त्यांना खूप पटतं आहे. म्हणजे आम्हाला संजना सारख व्हायचं आहे, असं ही म्हणणारे प्रेक्षक माझ्याकडे आहेत.”

हेही वाचा – “…त्यानंतरच होकार दिला”, ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजना भूमिका स्वीकारण्यापूर्वी रुपाली भोसलेने केला होता ‘हा’ विचार

“बऱ्याच महिला, मुलगी संजनामध्ये स्वतः पाहतात. मला तसे मेसेज देखील आले आहेत. पण कधीच वाईट मेसेज आले नाहीत. कारण लोकांना संजनाची भूमिका करणारी रुपाली ही माहित आहे. या मालिकेच्या आधी रुपालीला प्रेक्षकांनी पाहिलं आहे. त्यामुळे ती अभिनय करते हे त्यांना माहितेय. आताचे प्रेक्षक सुजान आहेत”, असं रुपाली भोसले म्हणाली.

Story img Loader