छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ मालिका लोकप्रिय आहे. या मालिकेतील देशमुख कुटुंब प्रेक्षकांना आपलंसं वाटतं. मालिकेतील कलाकरांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. अभिनेत्री रुपाली भोसलेलाही याच मालिकेतून लोकप्रियता मिळाली. मालिकेत संजना हे पात्र साकारुन ती घराघरात पोहोचली.

रुपाली सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच रुपालीने बाळाबरोबरचा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रुपाली बाळाला खेळवताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून मालिकेतील अनघाची प्रसुती होऊन तिला बाळ झालं आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. आई कुठे काय करते मालिकेतील अनघा प्रेग्नंट असल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळेच रुपालीचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना प्रश्न पडला आहे. तशा आशयाच्या कमेंटही चाहत्यांनी केल्या आहेत.

Gashmeer Mahajani
“परत तिच्या कुशीत…”, गश्मीर महाजनी आईबद्दल बोलताना म्हणाला, “घरी दोन लहान मुलं…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Mother Always Protect Her Child
आई आहे ना…! वेगात येणारी राईड पाहून चिमुकलीने काढला पळ अन् पाहा VIDEO चा जबरदस्त शेवट
Image Of Anjali Damania And Walmik Karad
Walmik Karad : “एका वाया गेलेल्या मुलाबरोबर…” आंदोलनाला बसलेल्या वाल्मिक कराडच्या आईला अंजली दमानियांचे ६ प्रश्न
Viral Video Shows Father And Daughter love
‘काय ते छोटे छोटे घास, काय ते तोंड पुसणे…’ एकाच ताटात बाबांबरोबर जेवणारी लेक; पहिला घास लेकीला, तर दुसरा… VIDEO व्हायरल
Mother love shocking video woman Went To Buy Milk for her baby And The Train Started Emotional Video
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
Shocking video Bride's Mother Cancels Wedding In Bengaluru After Groom's Drunken Misbehaviour video
VIDEO: “लेकीपेक्षा महत्त्वाचं काहीच नाही” लग्नात दारु पिऊन पोहोचला नवरदेव; नवरीच्या आईनं भर मांडवात काय केलं पाहा
aamir khan kiran rao
“त्याची आई अजूनही…”, किरण रावचं आमिर खानच्या कुटुंबाबद्दल भाष्य; त्याच्या मुलांची नावं घेत म्हणाली…

हेही वाचा >> “लग्न कधी करणार?”, चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर यामी गौतमचं भन्नाट उत्तर, पतीबरोबरचा फोटो पोस्ट करत म्हणाली…

रुपालीने चाहत्यांच्या या कमेंटला उत्तर देत त्यांची शंका दूर केली आहे. हे बाळ अनघाचं नसून ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटवर भेट देण्यासाठी आलेल्या कुटुंबातील होतं, असं तिने म्हटलं आहे. रुपालीने बाळाबरोबरच्या या व्हिडीओला छान कॅप्शनही दिलं आहे. “माणसाने कसं समुद्रासारखं असावं ‘अथांग’. भरतीचा माज नाही आणि ओहेटीची लाज नाही”, असं तिने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा >> रस्त्यावरील छोट्या मुलीला पैसे दिल्यानंतर दुसरा मुलगाही काजोलच्या गाडीमागे धावला अन्…; पाहा व्हिडीओ

हेही पाहा >> Photos : आलिया भट्टने पहिल्यांदाच केलं मॅटर्निटी फोटोशूट; बेबी बंप फ्लॉन्ट करत केलं पाऊट

“हा चिमुकला सेटवर आला होता. असं म्हणतात, लहान मुलं आईजवळ असली तर तिला सोडून ते कोणाकडेच जात नाहीत. आईच्या स्पर्शात त्यांना सुरक्षितता जाणवते. एवढ्या वयात त्यांना काय कळतंय असं आपण म्हणतो. पण त्यांना खरंच खूप काही कळत असतं. मी भाग्यवान आहे, की सेटवर आलेला हा चिमुकला त्याचं नाव ‘अथांग’. लहान मुलांची प्रचंड आवड असल्याने मला त्यांच्याशी गप्पा मारायला मजाच येते. मुलं म्हणजे देवाघरची फुलं”, असंही पुढे तिने म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

Story img Loader