‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका घराघरात पोहोचली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील नवनवीन ट्विस्टमुळे प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील प्रत्येक पात्र गाजलं आहे. खलनायिका असो किंवा नायिका प्रेक्षकांनी या मालिकेतील प्रत्येक पात्रावर तितकंच प्रेम केलं आहे. असंच एक लोकप्रिय पात्र म्हणजे संजना. अभिनेत्री रुपाली भोसले हिनं संजना उत्तमरित्या साकारली आहे. यापूर्वी संजना हे पात्र अभिनेत्री दिपाली पानसरेनं साकारलं होतं. पण काही काळानंतर तिची मालिकेतून एक्झिट झाली आणि तिच्या जागी रुपाली झळकली. अशा या रुपालीनं आपल्या अभिनय कौशल्यानं संजना ही भूमिका उत्तमरित्या पेलली. तिला यासाठी गौरविण्यातही आलं होतं. अशा या लोकप्रिय अभिनेत्रीनं एका लोकप्रिय बॉलीवूडच्या लोकप्रिय सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शकाबरोबर काम केल्याचं समोर आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “कॉलेजमध्ये असताना…”, तेजश्री प्रधानचा पहिल्या प्रपोजबद्दल खुलासा, म्हणाली…

अभिनेत्री रुपाली भोसले आपल्या कामाबरोबरच सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. प्रत्येक अपडेट चाहत्यांबरोबर शेअर करत असते. नुकतीच तिनं बॉलीवूडचे लोकप्रिय सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक महेश लिमयेविषयी पोस्ट शेअर केली आहे; जी चांगलीच चर्चेत आली आहे.

हेही वाचा – ‘प्रेमाची गोष्ट’ फेम तेजश्री प्रधानचं पहिलं क्रश कोण होतं? जाणून घ्या

रुपालीनं महेश लिमयेंबरोबर फोटो शेअर करत लिहीलं आहे की, “जिथे इच्छा असते तिथे मार्ग दिसतो. मला असं वाटतं तुझ्याबरोबर काम करण्याची इच्छा मी सतत डोक्यात आणि मनात घोळवत होते म्हणून ती सत्यात उतरली. तुझ्याबरोबर काम करायला खूप मज्जा आली. खूप काम आणि वेळ कमी पण तरीही ते वेळेत पूर्ण झालं. आणि तेही तुझ्या कामाइतकं सोप आहे. तुझ्यामुळे सेटवरच वातावरण तर खूप सकारात्मक, शांत आणि खेळकर होतं आणि त्यामुळे सगळेच पूर्ण सकारात्मक ऊर्जेनं काम करत होते. तू प्रत्येक फ्रेम सुंदर केलीयेस. मी तुझ्यामुळे त्यामध्ये सुंदर दिसतेय. धन्यवाद महेश या अद्भुत अनुभवाबद्दल.”

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये ‘हा’ आहे चिडका बिब्बा; समीर चौघुले म्हणाले…

हेही वाचा – भक्ती बर्वे: ‘सळसळत्या ऊर्जेची फुलराणी’

दरम्यान, रुपालीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिनं बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच तिनं हिंदी मालिकांमध्ये काम करून आपला ठसा उमटवला आहे. शिवाय ती बिग बॉस मराठीतही झळकली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aai kuthe kay karte fame rupali bhosale work with popular cinematographer and director mahesh limaye pps
Show comments