‘आई कुठे काय करते’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर पाच वर्ष अधिराज्य गाजवलं. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती. ‘आई कुठे काय करते’ मालिकेने प्रेक्षकांना खूप चांगलं खिळवून ठेवलं होतं. या मालिकेतील नायिका अरुंधती म्हणजे अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरवर जितकं प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. तसंच या मालिकेतील खलनायिकेलादेखील प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजना चांगलीच गाजली. आता संजना म्हणजे अभिनेत्री रुपाली भोसले पुन्हा एकदा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याबाबत स्वतः रुपालीने खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजना ही भूमिका पूर्वी अभिनेत्री दिपाली पानसरेने साकारली होती. पण काही काळानंतर दिपालीने प्रेक्षकांचा निरोप घेतला आणि तिच्या जागी रुपालीने ‘आई कुठे काय करते’ मालिकेत एन्ट्री घेतली. दिपाली प्रमाणे तितक्याच ताकदीने रुपाली ही भूमिका पेलेलं का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. पण रुपालीने संजना ही भूमिका उत्कृष्टरित्या साकारली आणि यासाठी तिला सर्वोकृष्ट खलनायिकेचा पुरस्कार मिळाला होता. अशी ही सर्वोत्कृष्ट खलनायिका पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

‘लोकमत फिल्मी’शी संवाद साधताना रुपाली भोसलेने लवकरच नव्या भूमिकेत झळकणार असल्याचं सांगितलं. यावेळी रुपालीला विचारलं, “पुन्हा एकदा कमबॅक करायचा विचार आहे?” तर रुपाली म्हणाली की, लवकरच. कारण मलाही जास्त वेळ वाट बघायची नाही. त्यामुळे लवकरच.

पुढे रुपाली भोसलेला विचारलं, “पुन्हा खलनायिका साकारायची इच्छा आहे की आता वेगळं करायचं आहे?” अभिनेत्री म्हणाली की, जे येईल ते करणार. असं काही नाही की, हेच करणार. जर निगेटिव्हसाठी विचारण्यात आलं, तर माझ्यासाठी ते आव्हानात्मक असेल. कारण एक प्रेक्षकांना दिलं आहे, तर अजून काय करता येईल. संजनाला ब्लर करणं माझ्यासाठी जास्त प्रायोरिटीचं असेल. संजनाला ब्लर करून नवीन भूमिका प्रेक्षकांमध्ये रुजवणं, हा हेतू असेल. त्याच्यामुळे माझ्यासाठी हे खूप आव्हानात्मक असेल.”

दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ मालिका संपल्यापासून रुपाली वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये पाहायला मिळत आहे. तसंच ती तिच्या आईला घरगुती व्यवसायात हातभार लावताना दिसत आहे. काही दिवसांपासून ती आईबरोबर वेगवेगळे पदार्थ बनवतानाचे फोटो, व्हिडीओ शेअर असते.