अभिनेत्री रुपाली भोसले हिने अनेक मालिकांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘बड़ी दूर से आये है’ या मालिकेतून घराघरात पोहोचली रुपाली सध्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेतील तिच्या संजना या भूमिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी रुपालीला ‘विनाकारण राजकारण’ या चित्रपटासाठी सर्वात्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार मिळाल्यानंतरची तिची भावना काय होती? याबाबत तिने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहिली होती. याचविषयी ‘लोकसत्ता ऑनलाइन’ बोलताना मात्र तिने एक खंत व्यक्त केली आहे.

हेही वाचा – वडील होते सुपरस्टार, आई आहे प्रसिद्ध अभिनेत्री; ‘या’ चिमुकलीला ओळखलंत का?

Dr. Nitin Raut, Dr. Milind Mane
उत्तर नागपूरमध्ये तिसऱ्यांदा राऊत- माने लढत
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
bhosari assembly constituency Election 2024 Latest News
भोसरी विधानसभेतून महाविकास आघाडीकडून अजित गव्हाणे यांचा अर्ज दाखल; लांडगे विरुद्ध गव्हाणे असा सामना होणार
Anees Ahmed Congress, Anees Ahmed, Congress,
काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा बंडाचा झेंडा? पक्षाच्या जातीय गणितावर थेट टीका, म्हणाले…
Anil Deshmukh Book On Devendra Fadnavis
Anil Deshmukh : फडणवीसांनी काय ऑफर दिली होती? पार्थ पवार, आदित्य ठाकरेंना कसं अडकवायचं होतं? अनिल देशमुखांचे पुस्तकातून धक्कादायक खुलासे
Senior Maharashtra minister Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar: लोकसभेनंतर भाजपाने रणनीतीत ‘हा’ महत्त्वाचा बदल केला, सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “RSS ने लोकसभेवेळी…”
Buddhist Dalit communitys displeasure is a challenge to Congress in Bhandara Constituency
बौद्ध दलित समाजाच्या नाराजीचे भंडारा मतदारसंघात काँग्रेससमोर आव्हान!
pathri assembly constituency
पाथरीच्या उमेदवारीसाठी महायुतीत कडवी स्पर्धा

हेही वाचा – खलनायिकेची भूमिका साकारल्यामुळे कधी प्रेक्षकांचा वाईट अनुभव आला का? रुपाली भोसले म्हणाली, “मला खूप….”

नुकतेच ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अभिनेते मिलिंद गवळी आणि रुपाली भोसले ‘लोकसत्ता ९९९’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी रुपालीला चित्रपटासाठी मिळालेल्या पहिल्या पुरस्काराविषयी विचारण्यात आलं. तेव्हा ती म्हणाली की, “‘विनाकारण राजकारण’ हा चित्रपटगृहात प्रदर्शित व्हावा आणि आम्हाला सगळ्यांना बघताना यावा. शिवाय स्वतःला मोठ्या पडद्यावर बघावं अशी खूप इच्छा होती. पण ते काही झालं नाही. दुर्दैवाने होतं ते आणि मी असेच असंख्य चित्रपट केलेत, पण जे आलेच नाहीत. ते का आले नाहीत? ते मला माहित नाही. ‘विनाकारण राजकारण’ या चित्रपटात मकरंद अनासपुरे, भार्गवी चिरमुले, पौर्णिमा अहिरे, विद्याधर जोशी असे बरेच कलाकार मंडळी आहेत. या सगळ्यांमध्ये सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा मला पुरस्कार मिळाला मी खूप आनंदी आहे.”

हेही वाचा – “अनिरुद्धच्या भूमिकेसाठी मी उत्साही नव्हतो”, मिलिंद गवळींनी सांगितलं ‘आई कुठे काय करते’ मालिका स्वीकारण्यामागचं खरं कारण, म्हणाले…

दरम्यान, मराठी मालिकाविश्वातील रुपाली भोसले सध्या हे चर्चेत असणार नाव आहे. तिच्या सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्ट नेहमी चर्चेचा विषय असतात. मालिका आणि चित्रपटाव्यतिरिक्त रुपाली ही ‘बिग बॉस’ मराठीच्या दुसऱ्या पर्वात झळकली होती.