‘बड़ी दूर से आये है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रुपाली भोसले सध्या ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत तिची खलनायिकेची भूमिका असली तरी प्रेक्षक वर्ग भरभरून प्रेम करताना दिसत आहे. रुपालीने साकारलेली संजना प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. सध्या रुपालीची सोशल मीडियावरील एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. ज्यामध्ये तिने विमानप्रवासातील अनुभव शेअर केला आहे.
हेही वाचा – Video: अशोक शिंदे यांचं डाएट ऐकून भाऊ कदम यांनी घेतला ‘हा’ निर्णय; पाहा व्हिडीओ
अभिनेत्री रुपाली भोसलेने काही फोटो शेअर करत लिहीलं, “हे खूप आश्चर्यकारक आहे. आजपर्यंत बॉलीवूड सेलिब्रिटीचे असे फोटो किंवा केबिन क्रू त्यांच्याबरोबर फोटो काढतायत, त्यांना काहीतरी गिफ्ट देतायत असे फोटो पाहिले होते. पण आज जेव्हा माझ्याबरोबर हे घडलं तेव्हा खरंच खूप छान वाटलं का माहिती नाही पण डोळे पाणावले. थोडी भावूक झाले. पण चेहऱ्यावर एक अलगद एक स्माइल आली.”
हेही वाचा – तत्त्वज्ञानात पदवी, स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा प्रभाव ते चुंबनदृश्यांसाठी प्रसिद्ध अभिनेत्री
हेही वाचा – Video: बायकोबरोबर भांडणं झाल्यावर काय करायचं? अविनाश नारकरांनी समस्त नवऱ्यांना दिला मोलाचा सल्ला, म्हणाले…
रुपालीच्या या पोस्टवर चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहतीनं लिहीलं, “का नाही? आपले मराठी कलाकार काय कमी टॅलेंटेड आहेत का? मला खूप आनंद झाला की तुमचं असं कौतुक झालं, तुम्ही त्यास पात्र आहात.” तर दुसऱ्या चाहत्यानं लिहीलं, “दुनियेत कुठेही गेला तरी महाराष्ट्रातला माणूस हा ग्रेटच, त्याच्या कलेला तर तोडच नाही.” तसेच तिसऱ्या चाहत्यानं लिहीलं, “‘आई कुठे काय करते’ मालिकेत खरंच खूप छान काम करते”
हेही वाचा – Video: ‘प्रेमाची गोष्ट’ फेम तेजश्री प्रधानने शुभांगी गोखलेंची केली नक्कल; पाहा व्हिडीओ
दरम्यान, रुपालीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिनं बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच तिनं हिंदी मालिकांमध्ये काम करून आपला ठसा उमटवला आहे. शिवाय ती बिग बॉस मराठीतही झळकली होती.