मराठी, हिंदी मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनयानं वेगळी छाप उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं आज निधन झालं. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. चार दशकांहून अधिक काळ चित्रपट, नाटक, मालिका या माध्यमांतून जयंत सावरकर यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करीत आहेत. अभिनेत्री रुपाली भोसले हिनं जयंत सावरकर यांच्याबरोबरचा एक व्हिडीओ पोस्ट करीत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री रुपालीनं ‘आई कुठे काय करते?’ मालिकेत जयंत सावरकर यांच्याबरोबर काम केलं होतं. याच मालिकेतील एका सीनचा व्हिडीओ तिनं इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे आणि लिहिलं, “जयंत सावरकर अण्णा. जेव्हा जेव्हा ते ‘आई कुठे काय करते?’ मालिकेच्या शूटिंगला यायचे तेव्हा तेव्हा ते आमच्या सगळ्यांना खूप आशीर्वाद व खूप सकारात्मक ऊर्जा द्यायचे. मी जेव्हा त्यांना भेटले तेव्हा मी त्यांना नमस्कार केला. त्यांनी भरपूर आशीर्वाद तर दिलेच; पण त्याच्याबरोबर माझ्या कामाचं खूप कौतुकसुद्धा केलं. आपली मालिका व आपलं काम ते बघतात हे ऐकून खरंच खूप खूप छान वाटलं आणि जबाबदारीची अजून जाणीव झाली. अण्णा तुम्ही आम्हा सगळ्या कलाकारांना खूप काही दिलंत व शिकवलंत. तुम्ही शेवटपर्यंत त्याच एनर्जीनं काम करीत होता. म्हणून त्यांच्याबरोबर केलेला हा सीन पोस्ट करतेय.”

हेही वाचा – ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन, पुलंचा ‘अंतू बर्वा’ अजरामर करणारा कलावंत काळाच्या पडद्याआड

रुपालीनं ही पोस्ट लिहीत जयंत सावरकरांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचबरोबर तिनं ‘जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ’ या गाण्याच्या ओळी हॅशटॅगमध्ये लिहिल्या आहेत.

हेही वाचा – “दिग्दर्शक ब्रेस्ट साइज विचारायचे अन्….” शर्लिन चोप्रानं सांगितला धक्कादायक अनुभव

हेही वाचा – “मुख्यमंत्र्यांना सलाम!” इर्शाळवाडी दुर्घटनेतील एकनाथ शिंदेंचे काम पाहून हार्दिक जोशीकडून स्तुतिसुमने, म्हणाला…

दरम्यान, जयंत सावरकर यांच्या निधनाची माहिती मुलगा कौस्तुक सावरकर यांनी दिली. काही दिवसांपासून ते आजारी होते. काल संध्याकाळपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं आणि आज जयंत सावरकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aai kuthe kay karte fame rupali bhosle share emotional post on jayant savarkar death pps