‘आई कुठे काय करते’ मालिकेत संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले नेहमीच काही ना काही कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असते. आपल्या ग्लमरस अंदाजाने सर्वांनाच घायाळ करणाऱ्या संजनाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. ती नेहमीच तिच्या कामाचे अपडेट आणि दैनंदिन जीवनातील वेगवेगळे क्षण सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.
रुपाली भोसलेने तिच्या इन्स्टाग्रामवर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. ज्याची बरीच चर्चा आहे. रुपाली भोसलेच्या आईचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने रुपालीने तिच्या इन्स्टाग्रावर आईचे काही फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. तिच्या या पोस्टची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे.
आणखी वाचा- “तो मला एकटीला…” रुपाली भोसलेने ‘त्याच्यासाठी’ केलेली पोस्ट चर्चेत
आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये रुपालीने लिहिलं, “माझ्या आईसारखी दुसरी कोणतीच स्त्री नाही. तिने मला आयुष्य दिलं, मला लहानाचं- मोठं केलं, मला शिकवलं, माझ्यासाठी ती भांडली आणि मला सावरलं. कधी मला ओरडली, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिचं माझ्यावर अमर्याद प्रेम आहे. ती माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे, शक्तीशाली आहे आणि तिचा माझ्यावर किती सकारात्मक परिणाम आहे हे मी शब्दात सांगू शकत नाही.”
रुपाली भोसलेच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांसह तिच्या सहकालाकारांनीही कमेंट केल्या आहे. अभिनेता अभिषेक देशमुखने या फोटोंवर कमेंट करत रुपालीच्या आईला शुभेच्छा दिल्या आहे. दरम्यान रुपालीच्या कामाबद्दल बोलायचं तर ‘संजना’च्या भूमिकेतून ती महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. अनेकजण तिला याच भूमिकेमुळे ओळखतात. आता ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत आगामी काळात संजनाच्या आयुष्यातही वेगळा ट्वीट आलेला पाहायला मिळणार आहे.