‘बिग बॉस’च्या प्रत्येक सीझनची प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगते. सध्या या कार्यक्रमाचा १७ वा सीझन सुरू आहे. यंदा ‘बिग बॉस’च्या घरात अंकिता लोखंडे व विकी जैन, मुनव्वर फारुकी, मनारा चोप्रा, अभिषेक कुमार, नील भट्ट, इशा मालवीय असे स्पर्धक अनेक सहभागी झाले आहेत. घरात अंकिताला इतर सदस्यांपेक्षा वेगळी वागणूक दिली जाते यावरुन घरातील सदस्यांसह नेटकऱ्यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. यावर आता ‘आई कुठे काय करते’ व ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातील स्पर्धक अभिनेत्री रुपाली भोसलेने आपलं मतं मांडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रुपालीने ‘बिग बॉस १७’ संदर्भात इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत आपलं मत मांडलं आहे. या पोस्टमधून तिने अभिनेत्री अंकिता लोखंडेला चांगलंच सुनावलं आहे. रुपाली तिच्या पहिल्या स्टोरीमध्ये लिहिते, “वीकेंडच्या वारला मनाराला मोठ्यांचा आदर कर असं नेहमी सांगितलं जातं. पण, इशाचं काय? तिला कधीच काहीच बोललं जात नाही. नील, रिंकू मॅम, ऐश्वर्या या इंटस्ट्रीमधील मोठ्या लोकांशी ती १९ वर्षांची मुलगी नेहमीच उद्धट बोलते. ‘बिग बॉस’ तुम्ही आधीसारखे नाही राहिलात आता पूर्णपणे तुमच्यात बदल झालाय.”

हेही वाचा : ‘प्रेमाची गोष्ट’ फेम मुक्ता-सागरचं ‘असं’ पार पडलं केळवण! इन्फ्लुएन्सर नलिनी मुंबईकरांकडे केलेली खास तयारी…

रुपाली पुढे लिहिते, “अंकिता पहिल्या दिवसापासून मी एकटी आहे, स्वतंत्र खेळते असं सांगत फिरत असते. पण, प्रत्यक्षात असं ती एकदाही वागत नाही. करण जोहरने तिला अगदी योग्य सल्ला दिला होता. नॉमिनेट झाल्यावर ती सुशांत सिंह राजपूतचं नाव का घेते? प्रत्येकवेळेला तिला सुशांतच्या चाहत्यांकडून सहानुभूतीची अपेक्षा असते. जर तू खरंच हुशार आहेस आणि नेहमी स्वतंत्र खेळू शकतेस, तर त्याच्या नावाचा आधार का घेतेस? तुला जुन्या गोष्टी व भूतकाळ घरात आठवण्याची काहीच गरज नाहीये.”

हेही वाचा : शुभमंगल सावधान! थाटामाटात पार पडला मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेचा विवाहसोहळा, समोर आला पहिला फोटो

रुपाली भोसले

“‘बिग बॉस’ आम्ही टास्क खेळून एक-एक पॉवर मिळवायचो किंवा टास्क केल्यावरच आम्हाला घरात वापरण्यासाठी सामान मिळायचं. पण, या घरात सगळ्या सदस्यांना सेव्हन स्टार हॉटेलसारखी वागणूक देण्यात येत आहे. हेअर ट्रिटमेंट करण्यासाठी बाहेरची लोक येत आहेत. मस्तच!” अशी पोस्ट शेअर करत रुपालीने आपलं मत मांडलं आहे. दरम्यान, रुपालीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ती ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aai kuthe kay karte fame rupali bhosle shares post on bigg boss 17 season and slams ankita lokhande sva 00