Aai Kuthe Kay Karte : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ सध्या शेवटच्या टप्प्या आहेत. ३० नोव्हेंबरपासून मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. काल, १९ नोव्हेंबरला मालिकेच्या चित्रीकरणाचा शेवटचा दिवस पार पडला. यावेळी सर्व कलाकार मंडळी भावुक झालेले पाहायला मिळाले. यानिमित्ताने मालिकेतील कलाकारांनी विविध एंटरटेनमेंट चॅनेलशी संवाद साधला. यावेळीच अभिनेत्री रुपाली भोसलेने संजनाकडून काय घेऊन जाणार? याविषयी सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डिसेंबर २०१९पासून ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या प्रवासाला सुरुवात झाली. अल्पावधीत ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. सुरुवातीला मालिकेत अभिनेत्री दिपाली पानसेरेने संजनाची भूमिका साकारली होती. पण काही काळानंतर तिची मालिकेतून एक्झिट झाली आणि संजना म्हणून रुपाली झळकली. रुपालीने त्याचं ताकदीने संजना निभावली. त्यामुळेच रुपालीला सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार मिळाला. रुपालीला आता संजना म्हणून अधिक ओळखलं जातं. अशी ही रुपाली संजनाकडून कोणती गोष्ट घेऊन जाणार? जाणून घ्या…

हेही वाचा – “आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं, आता पुढील पाच वर्षे…”, मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, पोस्ट करत म्हणाले…

हेही वाचा – AR Rahman Divorce : २९ वर्षांचा संसार मोडला; ए. आर. रेहमान व सायरा बानू होणार विभक्त, जारी केलं निवेदन

नुकताच रुपाली भोसलेने ‘अल्ट्रा मराठी बझ’ चॅनेलशी संवाद साधला. यावेळी तिला विचारलं की, संजनाकडून काय घेऊन जाणार? रुपाली म्हणाली, “संजनाकडून काही घेऊन जाणार नाही. संजना इथेच ठेवून जाणार आहे. कारण खऱ्या आयुष्यात रुपाली म्हणून जगेल. इतकी वर्षे रुपाली म्हणून वैयक्तिक आयुष्याचा प्रवास केला. त्यामुळे मला नाही वाटतं, संजनाच्या काही गोष्टी घेऊन जायला पाहिजे. कारण रुपाली तेवढी सक्षम आहे.”

हेही वाचा – Video: हळद, साखरपुडा, संगीत, सप्तपदी अन् बरंच काही…; भगरे गुरुजींच्या मुलाच्या लग्नसोहळ्यातील Unseen व्हिडीओ पाहा

“संजनाला जशी वागणूक मिळाली आहे. तशी रुपालीला खऱ्या आयुष्यात वागणूक नाही मिळालीये. त्यामुळे ते सगळं काही घेऊन जाता मला येणार नाही. खऱ्या आयुष्यात मला ते सहन होणार नाही. मुळात मी माझ्या खऱ्या आयुष्यात माझ्या कुटुंबाबरोबर आनंदी आहे. माझे आई, बाबा, भाऊ हे माझं पहिलं प्राधान्य आहे, हे सगळ्या जगाला माहित आहे. त्यामुळे संजना खूप वेगळी आहे. रील आणि रियल लाइफ खूप वेगळं आहे. त्यामुळे मी या दोन्ही गोष्टी कधी मिक्स केल्या नाहीत. हे केल्याने खूप गोष्टींचा त्रास होतो. त्यामुळे संजनाला तिच्या जागीच ठेवून जाणार आणि पुढच्या प्रवासाला निघणार,” असं रुपाली भोसले म्हणाली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aai kuthe kay karte fame rupali bhosle what will be taken from sanjana softnews pps