‘स्टार प्रवाह’वरील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली मालिका ‘आई कुठे काय करते’ अजूनही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. या मालिकेतील नवनवीन ट्विस्टमुळे प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. तसंच मालिकेतील प्रत्येक कलाकारांनी आपापली पात्र उत्कृष्टरित्या निभावल्यामुळे प्रेक्षकांचं त्यांना भरभरून प्रेम मिळत आहे. मग नायिका असो किंवा खलनायिका या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक घर निर्माण केलं आहे. असंच एक लोकप्रिय पात्र म्हणजे संजना. अभिनेत्री रुपाली भोसले हिनं संजना उत्तमरित्या साकारली आहे. खलनायिका म्हणून दिसलेली रुपाली आता मालिकेत थोड्या वेळ्या रुपात पाहायला मिळत आहे. अशा या लाडक्या अभिनेत्रीला मोठा आनंद झाला आहे. का? ते जाणून घ्या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “शब्दच नाहीत…” विशाखा सुभेदारचा ‘हा’ व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

अभिनेत्री रुपाली भोसले सोशल मीडियावर फार सक्रिय असते. दैनंदिन जीवनातील गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असते. नुकतीच तिनं एक आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. ते म्हणजे रुपालीला अंबरनाथ फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘विनाकारण राजकारण’ या चित्रपटासाठी सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. याच पुरस्काराबरोबर फोटो शेअर करून तिनं भलीमोठी पोस्ट लिहिली आहे.

हेही वाचा – “मला बऱ्याचदा ऑनस्क्रीनवरील मी आवडत नाही”; ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरी असं म्हणाली? जाणून घ्या…

रुपालीनं लिहीलं आहे की, “सिनेमाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की सिनेमा हे लार्जन दॅन लाइफ असतं आणि ते अगदी खरं आहे. सिनेमा थिएटर मध्ये गेल्यानंतर ते आपल्या सगळ्यांना जाणवतं. भव्य दिव्य थेटर, अगदी छान आरामदायक आसन, एसी आणि खूप मोठा पडदा, ज्याच्यावर आपल्याला सिनेमा दिसतो. मोठ मोठ्या स्पीकर्स मधनं आपल्याला आवाज आणि म्युझिक ऐकायला मिळतं. तीन तासांमध्ये एक वेगळाच अनुभव आपल्याला मिळतो. तसा अनुभव आपल्याला टेलिव्हिजनवर कधी मिळणार नाही, कारण टेलिव्हिजनचा पडदा छोटा असतो.”

“आजपर्यंत मला बऱ्याच लोकांनी विचारलं की, तुम्ही सिनेमे का नाही करत? किंवा तुम्ही आजपर्यंत सिनेमे का नाही केले? पण असं नाहीये की, मला सिनेमा करायचा नव्हता, माझ्या वाटेला सिनेमे आलेच नाहीत. आले ते पण खूप मोजके आले. मला खरंच आवडलं असतं सिनेमा करायला आणि मला अजूनही सिनेमे करायची खूप इच्छा आहे. जे मोजके सिनेमे मी केले त्यातला हा ‘विनाकारण राजकारण’ हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. आणि त्या चित्रपटाच्या भूमिकेसाठी मला हे अवॉर्ड ही मिळालं. माझ्यासाठी हा आनंद खूप मोठा आहे, कारण हे सिनेमाचं अवॉर्ड आहे.”

“ज्यावेळेला मी या क्षेत्रात यायचं ठरवलं. या क्षेत्रातला येण्याचा मार्ग अगदी थेटर मध्ये अंधारात जेव्हा आपण आपली जागा शोधत असतो आपण चाचपडतो थोडं धडपडतो आणि मग शेवटी आपल्याला आपली जागा मिळते. तसंच मी जेव्हा या क्षेत्रात आले त्यावेळेला चाचपडत नाटक क्षेत्रात प्रवेश केला आणि तिथे मला माझी जागा मिळाली. मग मालिकांच्या मार्गात चाचपडले आणि तीही माझी जागा आज मला मिळाली आहे. कदाचित हे जे सिनेमाचं अवॉर्ड मला मिळालं आहे ते कदाचित एक संकेत असू शकतं. ‘विनाकारण राजकारण’च्या पूर्ण टीमचे आणि अंबरनाथ फिल्म फेस्टिव्हल या टीमचे मी खूप खूप आभार मानते,” असं रुपालीनं लिहीलं आहे.

हेही वाचा – Video: अखेर क्रांती आणि समीर वानखेडेंच्या जुळ्या मुलींची पहिली झलक समोर; अभिनेत्रीने शेअर केला गोड व्हिडीओ

दरम्यान, रुपालीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिनं बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच तिनं हिंदी मालिकांमध्ये काम करून आपला ठसा उमटवला आहे. शिवाय ती बिग बॉस मराठीतही झळकली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aai kuthe kay karte fame rupali bhosle won the best supporting actress award for the movie vinakaran rajakaran pps