छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मराठी मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत असलेल्या सगळ्या कलाकारांचे लाखो चाहते आहेत. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. नुकतंच मिलिंद गवळी यांनी बालदिनानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लहान मुलांबद्दल आणि त्यांच्या शिक्षणाबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे.

दरवर्षी १४ नोव्हेंबर या दिवशी बालदिन साजरा करतात. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो. यंदाच्या बालदिनानिमित्त मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.
आणखी वाचा : “तुमच्याकडे पैसे कमी असतील तरी…” प्रिया बापटची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Supreme Court on maternity leave
दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Milind Gawali
“या पाच वर्षांत…”, ‘आई कुठे काय करते’मधील भूमिकेबद्दल मिलिंद गवळींचे मोठे वक्तव्य; म्हणाले, “अनिरुद्धला…”
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
chatura cesarean delivery
स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?
Who is heir of Babasaheb ambedkar Gavai or Ambedkar
बाबासाहेबांचे वारसदार कोण? आंबेडकर की गवई?
diet of small babies, Health Special, Health tips,
Health Special: लहान बाळांचा आहार कसा असावा?

मिलिंद गवळी यांची पोस्ट

बाल दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. खरंतर आपल्यासाठी रोजच बाल दिन असायला हवा, खरंच लहान मुलांमुळे, जग सुंदर आहे, आपल्या सगळ्यांचे जीवन सुंदर आहे, आणि लहान मुलं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, त्यांच्या उज्वल भविष्यासाठी आपल्याला प्रामाणिक कष्ट करायला हवेत, निसर्गाची, पर्यावरणाची, आपल्या या पृथ्वीची, आज आपण काळजी घेतली तर भविष्यामध्ये त्यांना एक सुंदर जग जगायला मिळेल.

मुलांना जन्माला घालायच्या आधी त्यांच्या आरोग्याची , त्यांच्या शिक्षणाची , त्यांच्या भविष्याची काळजी घेता येत असेल तरच मुलांना जन्माला घालावे, कारण ज्या वेळेला आपण बाल मजूर बघतो, आपण लहान बाळं भीक मागताना बघतो, रस्त्याच्या कडेला घाणीत जगताना बघतो, त्यावेळेला मनाला खूप दुःख होतं , आपण किती असाह्य आहोत, आपल्याला माणूस म्हणून घ्यायच्या लायकीचेच नाही आहोत असं वाटायला लागतं. असं नाही होऊ शकत का

जगामध्ये कुठलंही लहान मूल उपाशी राहता कामा नये , मग तो आफ्रिकेतला असो अमेरिकेतला असो किंवा भारतातला असो, असं होऊ शकत का , की प्रत्येक बालकाला शिक्षण , आरोग्य हे सगळं तो मोठा होईपर्यंत , त्याला सहज मिळू शकेल, सगळ्याच मुलांना समान शिक्षण नाही का मिळू शकत, लाखो रुपये फी घेतलेल्या शाळांमध्ये वेगळे शिक्षण आणि गावाखेड्यातल्या पाड्यांमध्ये वेगळे शिक्षण, मुनसीपांटी च्या शाळांमध्ये वेगळे शिक्षण ..असं का…? असा बालदिन येईल का? जगातली सगळीच बाळं सारखी , त्यांना सगळंच सारखं.. डॉ. एपीजे अबदुल कलाम सर हे स्वप्न पहात होते…, अशी पोस्ट मिलिंद गवळी यांनी केली आहे.

आणखी वाचा : शिवसेनेचा पदाधिकारी, ८ वर्षांचे रिलेशन आणि घटस्फोट, जाणून घ्या अपूर्वा नेमळेकरच्या पूर्वाश्रमीच्या पतीबद्दल…

त्याच्या या पोस्टला अनेकांनी लाइक्स आणि कमेंट केल्या आहेत. तसेच त्याची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. दरम्यान सध्या आई कुठे काय करते या मालिकेत चांगली रंजक वळणे येत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे ते कायमच चर्चेत असतात.