छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मराठी मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत असलेल्या सगळ्या कलाकारांचे लाखो चाहते आहेत. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. नुकतंच मिलिंद गवळी यांनी सुट्टीबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे ते चर्चेत आले आहेत.

मिलिंद गवळी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते इन्स्टाग्रामद्वारे फोटो-व्हिडीओ पोस्ट करत असतात. नुकतंच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ते सायकलिंग करताना, छान फिरताना दिसत आहे. त्याला त्यांनी हटके कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “एवढ्या खालच्या थराला…” मानसी नाईकने सांगितले घटस्फोट घेण्यामागचे कारण

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
a student expressed about life after his father death
“अपघातात वडील वारले अन्…” चिमुकल्याने सांगितली व्यथा; विद्यार्थ्यांसह शिक्षकही रडले, पाहा VIRAL VIDEO
Gashmeer Mahajani
“दिवसभर मद्यप्राशन करायचो, स्वत:ला सहा महिने कोंडून घेतलं…”, नैराश्यात गेलेला गश्मीर महाजनी, सांगितला ‘तो’ कठीण काळ

मिलिंद गवळींची पोस्ट

“सुट्टी – डेली सोप टीव्ही सिरीयलमध्ये काम करणाऱ्याला सलग पाच दिवस सुट्टी मिळणं खूपच कठीण असतं, शाळेच्या परीक्षा झाल्यानंतर आपल्याला ज्यावेळेला सुट्टी मिळायची समर व्हेकेशनमध्ये, त्यावेळेला मनामध्ये जी फिलिंग असायची तीच फिलिंग आजही येते मला, अरुंधतीने आशुतोष बरोबर लग्न करण्याचा निर्णय सांगितला नंतर अनिरुद्ध जे अरुंधतीला बोलतो, आणि त्यानंतर संजना ला ते कळल्यानंतर अनिरुद्ध संजनाशी ज्या पद्धतीने बोलतो.

मला बोर्डाच्या परीक्षेत ज्या पद्धतीचं फिलिंग होतं त्याच पद्धतीच फिलिंग मला येत असतं. बोर्डाच्या परीक्षेचा निकाल लागला की मला शिव्या पडायच्या. आजही एपिसोड टेलिकास्ट झाल्या की त्यानंतर मला शिव्या पडतात. फार काही बदलत नाही, आणि मग सुट्टी मिळाली की आई ज्या पद्धतीने अभ्यास करण्यासाठी मुलाला घरात डांबून ठेवते आणि मग तो मुलगा कसाबसा अभ्यास पूर्ण करून बाहेर खेळायला पळतो, अगदी तसाच मोकळा श्वास घ्यायला मी सुद्धा अजूनही पळतो.

आता काही फार बदल झालेला नाहीये फक्त काही खेळ बदलले आहेत, भवरे, गोट्या,पतंग, विटी दांडू, क्रिकेट, या खेळांचे ऐवजी योगा प्राणायाम सायकलींग ट्रेकिंग कॅरम बॅडमिंटन… अनिरुद्धने डोक्याचा भुगा केलेल्या माणसाला तर डोकं शांत ठेवण्यासाठी सुट्टी ही हवीच, पण एका कलाकाराच्या जीवनामध्ये भरपूर सुट्ट्या येत असतात, ज्या वेळेला त्याच्याकडे काम नसतं त्यावेळी तो नको नको असताना सुद्धा सुट्टीवरच असतो.

प्रत्येक कलाकाराला हे असं व्हेकेशन नकोस होत असतं, भरपूर काम करून मिळालेले वेकेशन खूप छान असतं पण, काम नाही म्हणून वेकेशन सुट्टी कुठल्याही कलाकाराला नको”, असे मिलिंद गवळी म्हणाले.

आणखी वाचा : “…तर मी आता कुठे असते?” स्नेहा वाघच्या पोस्टने वेधलं लक्ष

दरम्यान मिलिंद गवळी यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. अभिनेते मिलिंद गवळी गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी मराठीसह हिंदी माध्यमांमध्येही काम केले आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानचे फोटो, व्हिडीओ ते सतत सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.

Story img Loader