‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते मिलिंद गवळी हे कायमच चर्चेत असतात. या मालिकेत ते अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा साकारताना दिसतात. या मालिकेमुळेच ते घराघरात पोहोचले. नुकतंच मिलिंद गवळी यांनी एका चित्रपटाचा किस्सा सांगितला आहे.
मिलिंद गवळी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते इन्स्टाग्रामद्वारे फोटो-व्हिडीओ पोस्ट करत असतात. नुकतंच मिलिंद गवळीने ‘सून लाडकी सासरची’ या चित्रपटाचा एक किस्सा सांगितला आहे. यावेळी त्यांनी या चित्रपटावेळी महिलांच्या रडण्याबद्दलही भाष्य केले आहे.
आणखी वाचा : नागराज मंजुळेंनी मराठी भाषेबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यानंतर मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले “मराठीवर प्रभुत्व असणारी…”
मिलिंद गवळींची पोस्ट
“रडावसं वाटलं तर माणसाने रडावं मन मोकळं करावं
असंख्य गोष्टी मनाविरुद्ध घडत असतात ,मनाला दुखावणाऱ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला सतत घडत असतात ,आपल्या मनाला त्याचा त्रास होत असतो आणि ते सतत चालू असतं.
आणि खूप आतल्या आत आपण साठवून ठेवत असतो,
मग अचानक बांध फुटतो आणि आपण उपसाभक्षी ढसाढसा रडायला लागतो आणि मग रडून झालं की मन शांत होत , आपल्याला बरं वाटतं
पूर्वीच्या काळी कुणी गेलं आणि जर त्याचा जवळचा व्यक्ती रडत नसेल तर त्याला जबरदस्ती रडायला लावायचे,
कित्येक वेळा माझ्या कानावर ते शब्द पडलेले आहेत , “मोकळी हो बाई मोकळी हो रड.”
एकदा producer कैं. अण्णासाहेब देशपांडे यांना मी म्हणालो होतो “का आपण रडके पिक्चर्स करायचे, का ओडियन्सला आपण रडवायचं, “
त्यांनी मला सांगितलं होतं की,
गावा खेड्यातल्या बायका आयुष्यामध्ये खूप सोसतात खूप सहन करतात, सिनेमाच्या माध्यमातून त्या मोकळ्या होतात, त्यांचं मन शांत होतं, आमच्या प्रोडूसर कैं. वासवानीने “सुन लाडकी सासरची ” चित्रपटांमध्ये बायकांना हात रुमाल वाटले होते,
त्यांना इतकी खात्री होती की सिनेमा बघताना बायका भरभरून रडणार.
सिनेमात काम करताना आम्हाला बरेच वेळेला रडायचे प्रसंग येतात, आम्हचं काम करत असताना मन मोकळं होतं,
सामान्य माणसाचं काय होत असेल, काहींना तर रडायची अजिबात सवयच नसते, च्या धकाधकीच्या जीवनामध्ये सगळं मनामध्ये साठवून राहत असेल का?
टॉक्सिक Toxic होत असेल का? Stressful होत असेल का?
म्हणून लोक आजारी पडत असतील का?
महत्त्वाचं म्हणजे जो माणूस रडतो, ज्याच्या डोळ्यातून अश्रू येतात, तो संवेदनशील तर असतोच पण तोच खरं आयुष्य जगतो असं मला वाटतं….”, असे मिलिंद गवळींनी म्हटले आहे.
आणखी वाचा : “ड्रग्ज ॲडिक्ट पण मीच…” ‘आई कुठे काय करते’मधील ‘अनिरुद्ध’च्या पोस्टने वेधले लक्ष
दरम्यान मिलिंद गवळी यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. मिलिंद गवळी गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी मराठीसह हिंदी माध्यमांमध्येही काम केले आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानचे फोटो, व्हिडीओ ते सतत सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.