छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. या मालिकेतील देशमुख कुटुंब प्रेक्षकांना आपलंसं वाटतं. अभिनेता मिलिंद गवळी हे या मालिकेत अनिरुद्ध देशमुख ही भूमिका साकारत आहेत. ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या टीआरपीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. नुकतंच मिलिंद गवळींनी या मालिकेबद्दल एक खास पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात. ते इन्स्टाग्रामद्वारे फोटो-व्हिडीओ पोस्ट करत असतात. नुकतंच त्यांनी आई कुठे काय करते या मालिकेतील एक व्हिडीओ केला आहे. या व्हिडीओत अनिरुद्ध हा अरुंधतीवर चिडलेला असल्याचे दिसत आहे. तो अरुंधतीवर बडबड करत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओला त्यांनी दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
आणखी वाचा : “माझ्या घरी एक राजकीय नेते यायचे, ते आले की…” मिलिंद गवळींची ‘ती’ पोस्ट चर्चेत
मिलिंद गवळींची पोस्ट
“अनिरुद्ध अरे थांब जरा थांब , किती बोलतोयस”
खरंच अनिरुद्ध सारखी माणसं किती बोलतात आणि काय काय बोलतात ,किती मनाला लागेल असं बोलतात ,कशाचाच भान ठेवत नाही ,समोरच्याला काय वाटेल? त्याला किती त्रास होईल ? त्याचं मन किती आपण दुखवतो आहोत , याचं कसलंच भान नाही या माणसाला, मग अशा माणसाची चीड नाही येणार का.?बर्याच वेळेला तर मला सुद्धा त्याची चीड येते. अनिरुद्ध बोलायला लागला की माझं सुद्धा डोकं भंणभंण करायला लागतात, कधी तर तो इतकं विचित्र बोलतो की मला असं वाटतं की माझं डोकं फुटेल कि काय. पण त्याला बोलावंच लागतं ,तो बोलला नाही तर, कसं व्हायचं?
काळ्या रंगाचा ब्लॅकबोर्ड असला तरच तर त्यावर पांढरी अक्षर उमटून दिसतील ना. हा अनिरुद्ध तो ब्लॅकबोर्ड आहे. बरं नमिता आणि मुग्धाने लिहिलेलं आम्हा सगळ्यांना बोलावच लागतं , न बोलून सांगतात कोणाला! बरं हा अनिरुद्ध पहिल्या एपिसोड पासूनच असाच आहे,
पहिल्या एपिसोड मध्ये अरुंधतीला घराच्या बाहेर काढलं होतं त्याने आणि आता सुद्धा तेच करतोय. सांगायचा मुद्दा काय आहे की , त्यांनी ही बडबड केल्यानंतर जे काय डोक्याचा भुगा होतो , तो कसा निस्तारायचा, तर शांत बसायचं. Meditation करायचं, पूर्वी बरं होतं , एक खूप शांत मांजर आमच्या सेटवर होती, खूपच मायाळू आणि प्रेमळ होती, तिच्याबरोबर मला खूप शांत वाटायचं , छान वाटायचं, ति जवळ येऊनच बसायची, तिच्या बरोबर माझं डोकं शांत व्हायचं
पण काय सगळ्यांना कुत्रे ,मांजरी ,पक्षी ,प्राणी आवडत नाहीत. त्यांच्यापैकी एक एक जण तिला लांब कुठेतरी सोडून आला, का तर शूटिंगच्या मध्ये मध्ये यायची म्हणून, त्यांना disturb व्हायचं.
These are the realities of life…पण मग हल्ली अनिरुद्ध खूपच डोक्यात जातो आणि बाहेर यायचं नावच घेत नाही”, असे मिलिंद गवळींनी या पोस्टमध्ये म्हटले.
आणखी वाचा : “स्वतःच्या करिअरसाठी तिने…” रेखा यांच्याबद्दल अरुणा इराणींचा धक्कादायक खुलासा
दरम्यान मिलिंद गवळी यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी मराठीसह हिंदी माध्यमांमध्येही काम केले आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानचे फोटो, व्हिडीओ ते सतत सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.