‘आई कुठे काय करते’ ही लोकप्रिय मराठी मालिका आहे. या लोकप्रिय मालिकेमध्ये अभिनेते मिलिंद गवळी हे अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा साकारतात. त्यांनी आतापर्यंत चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये काम केले आहे. नुकतंच मिलिंद गवळी यांनी अभिनेते अशोक सराफ यांचा उल्लेख करत पोस्ट केली आहे. त्यामुळे ते चर्चेत आले आहेत.

मिलिंद गवळी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते इन्स्टाग्रामद्वारे फोटो-व्हिडीओ पोस्ट करत असतात. नुकतंच मिलिंद गवळींनी इनस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते पारंपारिक वेशभूषेत पाहायला मिळत आहे. याला त्यांनी हटके कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : १ मिस्डकॉल आणि २ कोटी जिंकण्यांची सुवर्णसंधी, ‘कोण होणार करोडपती’मध्ये सहभागी व्हायचंय? जाणून घ्या प्रक्रिया

Cm Devendra Fadnavis Statement About Suresh Dhas
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सुरेश धस आधुनिक भगीरथ एकदा मागे लागले की डोकं खाऊन….”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
Shivraj Rakshe Mother Said This Thing
Shivraj Rakshe : शिवराज राक्षेच्या आईचा सवाल, “पंचांवर कारवाई का नाही? त्यांनी माझ्या मुलाला शिवीगाळ केली आणि…”
kajol sister tanisha on working woman
“महिलांनी मुलांच्या संगोपनासाठी घरी राहावं”, अभिनेत्री काजोलच्या बहिणीचे वक्तव्य; म्हणाली, “माझी आई आमच्याजवळ…”
Myra Vaikul
मायरा वायकूळ रडण्याचा सीन शूट करण्यासाठी काय करायची? म्हणाली, “मी एका जागेवर…”
Meera Jaggnath
ज्याच्यासाठी साखरपुडा मोडला तो मुलगाच…; ‘ठरलं तर मग’फेम मीरा जगन्नाथने केला खुलासा; म्हणाली, “सहा महिन्यांनी…”
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”

मिलिंद गवळींची पोस्ट

“लहानपणापासून आपण आपल्याबद्दल एक धारणा तयार करतो, अमुक अमुक गोष्टी आपल्याला आवडतात, अमुक आवडतच नाही, लहानपणीच आपलं ठरलेलं असतं की या या भाज्या आपल्याला आवडतात या आवडत नाही, काहींना गोड आवडतं काहींना तिखट आवडतं, असंच आवडतं.

आपण असेच आहोत, माझे लहानपणी खाण्यापिण्याचे खूप नखरे होते, आणि आई होतीच माझे लाड पुरवायला, माझ्यासाठी वेगळा स्वयंपाक केला जायचा, दहावीनंतर वडिलांनी मला नाशिकला भोसला मिलिटरी स्कूलमध्ये पाठवलं, पहिल्याच दिवशी ताटात जे जेवण आलं, माझ्याबरोबर अनेकांनी तोंडं वाकडी केली, थोडसं खाल्लं आणि ताटात अन्न टाकून उठलो, मेजर राठोड आले शांतपणे म्हणाले “ खाना पुरा खतम करो , एक दाना भी प्लेट मे नही बचना चाहिए” आणि आम्हाला बंदूक घेऊन मोठ्या ग्राउंडला दहा राऊंड मारायची शिक्षा.

त्या दिवसापासून आजपर्यंत खाण्यापिण्याचे माझे सगळे लाड नखरे संपले, ताटात जे येईल ते निमुटपणे खायचं नखरे करायचे नाहीत. पण कपड्यांच्या बाबतीत माझे नखरे चालूच होते, मला हे शोभतं , मला ते शोभत नाही , मी हे घालणार मी हे घालणार नाही , असं बरीच वर्ष चाललं होतं, हा रंग मला आवडतो हा रंग मला आवडत नाही,

अनेक वर्ष सिनेमांमध्ये मी माझे स्वतःचेच कपडे घेऊन जायचं कारण कपड्यांसाठी मराठी सिनेमाचं बजेट खूप कमी असायचं त्यामुळे त्यांचे साधे स्वस्तातले कपडे मला कधीच आवडले नाहीत, ती माझी सवय अशोक सराफांमुळे मोडली, माझे कपड्यांचे नखरे बघून ते एक दिवस मला म्हणाले “प्रेक्षक कपडे नाही अभिनय बघतात अभिनयाकडे लक्ष दे, मी दोन झब्बा पायजमा वर hit सिनेमे केले आहेत आणि त्यानंतर सिनेमा असो सिरीयल असो मी मला जे कपडे ते देतील ते आजपर्यंत निमूटपणे घालत आलो. पण वैयक्तिक जीवनात मला माझ्याच choice चे कपडे घालायला आवडायचे,

पण “ आई कुठे काय करते “ दरम्यान बरेचसे events केले. अनेक designers ने माझ्यासाठी costumes create केले . जे माझ्या comfort zone च्या पलीकडचे होते, भोसला मिलिटरीतले मेजर राठोड सारखेच माझे डिझायनर आहेत, डिझायनर भाग्यश्री ,दर्शना शानबाग , प्रणिता तन्मय… अधिकाऱ्याने आणि हक्काने मला experiments करायला सांगतात..”, असे मिलिंद गवळींनी म्हटले.

दरम्यान ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते मिलिंद गवळी हे कायमच चर्चेत असतात. या मालिकेत ते अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा साकारताना दिसतात. या मालिकेमुळेच ते घराघरात पोहोचले. सध्या ही मालिका टीआरपीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पाहायला मिळत आहे. यात विविध ट्वीस्ट येतानाही दिसत आहेत.

Story img Loader