Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने पाच वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन केले आहे. ३० नोव्हेंबरला ही मालिका सर्वांचा निरोप घेत आहे. त्यासाठी शेवटच्या भागाचे शूटिंग सुरू आहे. शेवटचे दिवस असल्याने सर्व कलाकार आपल्या आठवणी आणि काही किस्से सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. त्यातील काही व्हिडीओंमध्ये कलाकार भावूक झाल्याचे दिसले. अशात आता मिलिंद गवळी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट करीत अनिरुद्ध देशमुख हे पात्र साकारण्यासाठी ते कसा मेकअप करतात याची माहिती त्यांनी सांगितली आहे.

पहिल्यांदाच त्यांनी मेकअपबद्दल ही माहिती दिली आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ते सुरुवातीला चेहऱ्याला बर्फ चोळत आहेत. मेकअप करण्याआधी ते चेहऱ्यावर अशा पद्धतीने बर्फ लावतात, असं त्यांनी सांगितलं आहे. “पाच वर्षांतला हिमालयातला बर्फ आज वितळणार. फार कमी लोकांना माहीत असेल की, मी चेहऱ्यावर मेकअप कसा करतो. कारण-याआधी मी असा कोणताही व्हिडीओ पोस्ट केलेला नाही.” असं मिलिंद गवळी व्हिडीओमध्ये सांगत आहेत. त्यानंतर त्यांनी एक मॉइश्चराइजर आपल्या चेहऱ्यावर लावलं आहे.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Aai Kuthe Kay Karte Fame Actress Kaumudi Walokar
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई! मालिकेतील कलाकारांनी केलं केळवण, सुंदर सजावटीने वेधलं लक्ष
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
shivali parab mother emotional after seeing the look of Mangla movie
‘मंगला’ चित्रपटातील शिवाली परबचा लूक पाहून आई झालेली भावुक; म्हणाल्या, “१२ तास चेहऱ्यावर मेकअप, जेवायला नाही अन्…”
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…

हेही वाचा : ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेता आणि शिवानी सोनार लवकरच अडकणार लग्नबंधनात, बॅचलर पार्टीचे फोटो आले समोर

चेहऱ्यावर मॉइश्चराइजर लावताना ते म्हणाले, “सध्या थंडी असल्यामुळे मी आता आता हे मॉइश्चराइजर वापरत आहे. याआधी मी हे वापरत नव्हतो.” पुढे मिलिंद गवळी यांनी चेहऱ्यावर एक आयुर्वेदिक क्रीम लावली आहे. “त्यामध्ये हळद असल्यानं दाढी करताना चेहऱ्यावर कापलं, तर सर्व पुरुषांना हे वापरता येतं”, असं त्यांनी व्हिडीओत सांगितलं.

पुढे मिलिंद गवळी यांनी त्यांच्या मेकअप आर्टिस्टची ओळखसुद्धा करून दिली आहे. त्यांनी सांगितलं, “हा दीपक…, गेली दोन वर्षं तो माझा मेकअप करत आहे. त्याच्याआधी समीर म्हात्रे होते. समीर म्हात्रे फार सीनियर मेकअपमन आहेत. पण, हल्ली ते हिंदीमध्ये काम करतात.”

पुढे त्यांनी राजू नावाच्या त्यांच्या एका मित्राचीही ओळख करून दिली. “राजू माझा स्टाफ, माझा मित्र, माझा सखा असं सर्व काही आहे. गेली पाच वर्षं त्यानं मला खूप मदत केली. तो माझी फार काळजी घेतो. त्यामुळे माझं काम सोपं झालं आहे”, असं मिलिंद गवळी म्हणाले.

शेवटच्या दिवशी शूटिंगचं टेन्शन

मिलिंद गवळींचा हा व्हि़डीओ ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या शेवटच्या भागाच्या शूटिंगआधीचा होता. त्यामुळे त्यांनी पुढे सांगितलं, “शेवटच्या दिवसाचं शूटिंग आहे. त्यामुळे मला थोडं टेन्शन आहे. पहिल्या दिवसाच्या शूटिंगला जसं टेन्शन आलं होतं, तसंच आजही आलं आहे. शेवटचे माझे तीन-चार सीन आहेत.”

“शेवटच्या सीनमध्ये काय होणार? हे मलाही माहीत नाही. अनिरुद्ध आता तरी सुधारतोय की नाही? कारण- शिक्षा तर त्याला फार मिळाली आहे. तो जेलमध्ये जाऊन आला आहे. अनेकदा त्याला आप्पा, कांचनआई, संजना, अरुंधती, खुशबू या सर्वांनी मुस्काटात मारून झालं आहे. त्यामुळे त्याला भरपूर शिक्षा मिळाली आहे, असं मला वाटतं. पण शेवट काय होतो, हे मला सध्या माहीत नाही”, असं सांगत व्हिडीओमध्ये पुढे मिलिंद गवळी यांनी सर्व रसिक प्रेक्षकांचे आभार मानत आपल्या पूर्ण मेकअपला सुरुवात केली.

हेही वाचा : व्याहीभोजन! ‘शिवा’चा आशू खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकणार; होणारी पत्नी काय काम करते? जाणून घ्या…

मेकअपचा हा व्हिडीओ पोस्ट करत मिलिंद गवळी यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘स्टार प्रवाह’ मी तुमचा खूप खूप आभारी आहे. या पाच वर्षांमध्ये खूप प्रोत्साहन दिलं. खूप खूप प्रेम दिलं. माझ्यासारख्या इतक्या छोट्या कलाकाराला एवढा मान दिलात. खरं तर माझ्याकडे तुमचे आणि तुमच्या संपूर्ण टीमचे आभार मानायला शब्द अपुरे पडतायत.

Story img Loader