छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील कलाकारांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. स्टार प्रवाह वाहिनीवरील ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. मालिकेत अरुंधती आशुतोषबरोबर लग्न करुन तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. अरुंधती व आशुतोषच्या लग्नाची धामधूम मालिकेत पाहायला मिळत आहे. नुकताच अरुंधती व आशुतोषच्या हळदीचा कार्यक्रम पार पडला.

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधतीचा लग्नाचा लूक समोर आला आहे. मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकरने तिच्या सोशल मीडियावरुन सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अरुंधती लग्नासाठी मेकअप करताना दिसत आहे. अरुंधती व आशुतोषच्या लग्नासाठी चाहतेही आतुर आहेत. मधुराणीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. नेटकऱ्यांनी कमेंटमधून अरुंधतीला लग्नानंतरच्या आयुष्यासाठी सल्ले दिले आहेत.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?
thipkyanchi rangoli fame Namrata Pradhan sister gunjan Pradhan will get marry
‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्रीच्या बहिणीचं ठरलं लग्न, आनंदाची बातमी देत म्हणाली…

हेही वाचा>> नवाजुद्दीन सिद्दीकी प्रकरणावर कंगना रणौतची प्रतिक्रिया, म्हणाली “नवाजुद्दीन साहेब…”

एकाने कमेंट करत “जुन्या साड्या दिल्या तरी नेसू नको, नाही म्हणायला शिक” असा सल्ला दिला आहे. “देविकाला लग्नात बोलवायला विसरू नका” अशी कमेंटही एकाने केली आहे. तर दुसऱ्याने “आता तरी नितीनची बायको वर्षाला दाखवा”, असं म्हटलं आहे. “लग्नानंतर फक्त छान साड्या अन हेअर स्टाईल द्यायला पाहिजे साधसं दोन वाट्यांच लांबसडक मंगळसुत्र घे तु सिंपलच छान वाटतेस” अशी कमेंटही एका चाहत्याने दिला आहे.

हेही वाचा>> “दर महिन्याला तिला १० लाख रुपये पोटगी देतो”, नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आरोपांवर पत्नी आलियाची प्रतिक्रिया, म्हणाली “पुराव्यांसह…”

दरम्यान, मालिकेत अरुंधती व आशुतोषची लगीनघाई सुरू असली, तरी त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अरुंधती आशुतोषबरोबर लग्न करून नवीन आयुष्याला सुरुवात करणार असल्यामुळे चाहतेही खूश आहेत. या मालिकेत मधुराणी प्रभुलकरसह मिलिंद गवळी, ओमकार गोवर्धन, रुपाली भोसले, किशोर महाबोले, अभिषेक देशमुख या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.

Story img Loader