‘आई कुठे काय करते’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची पसंती मिळवली. या मालिकेतील कलाकारांचा अभिनय आणि याचबरोबर या मालिकेची कथा प्रेक्षकांना खूप आवडली. पण गेल्या काही महिन्यांमध्ये या मालिकेत अनेक ट्विस्ट आणि टर्न येत आहेत. अशातच या मालिकेचा आता एक नवीन प्रोमो समोर आला आहे.

काही महिन्यांपूर्वी या मालिकेमध्ये आशुतोष आणि अरुंधती यांचा लग्न सोहळा संपन्न झाला. लग्नानंतरही त्यांच्या संसारात अनेक चढ-उतार येताना दिसत आहेत. तर आता आशुतोषने अरुंधतीकडे त्याला बाबा व्हायचं असल्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Only difference is education toddlers strugglet to help family a video
“प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते, तुला संधी मिळाली सोन कर” वयात येणाऱ्या मुलांना बापानं दाखवावा असा VIDEO; पाहून आयुष्य बदलेलं
Paaru
Video : “देवा, या जंगलात मी…”, जंगलात हरवलेल्या पारूवर संकट येणार? आदित्य पारूला वाचवू शकणार का? मालिकेत ट्विस्ट
Muramba
Video: “हिला रमा बनवणं अवघड…”, अक्षयसाठी मॉडर्न माही रमा बनणार का? ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
pataal lok seson 2 new promo
Video : “मौसम बदलने वाला है…”; ‘पाताल लोक २’ चा प्रोमो आला प्रेक्षकांच्या भेटीला, हाथीराम चौधरीच्या मानेवरील ‘ती’ तारीख पाहून नेटकरी म्हणाले…
Paaru
Video : “माझं आदित्य सरांबरोबर लग्न…”, दारूच्या नशेत काय करणार पारू? मालिकेत येणार ट्विस्ट
Uncle dangerous stunt on scooty video viral shocking video on social media
ओ काका जरा दमानं! उलटे उभे राहून बाईक चालवायला गेले अन्… विचित्र स्टंटबाजीचा VIDEO होतोय व्हायरल

आणखी वाचा : “हिला स्वतःची पोरं सांभाळता आली नाहीत आणि…”, ‘आई कुठे काय करते’च्या ट्रॅकमुळे प्रेक्षक हैराण, नाराजी व्यक्त करत म्हणाले…

वाहिनीने या मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केला. यात आशुतोष अरुंधतीला म्हणतो, “मला बाबा व्हायचं आहे अरुंधती. आपण मूल दत्तक घेतलं तर?” त्यावर अरुंधती त्याला म्हणते, “ते शक्य नाहीये. पुन्हा एक नवीन जीव आपल्या आयुष्यात येणार. आपण त्याला मोठं करायचं…या सगळ्याला खूप बळ लागतं. मला नाही वाटत आता माझ्याकडे ते उरलं आहे.”

हेही वाचा : “बाई तू परत ये, इथे सगळ्यांना वेड लागलंय…,” ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरला नेटकऱ्यांनी घातलं साकडं, म्हणाले…

हा प्रोमो सोशल मीडियावर येताच चांगलाच चर्चेत आला आहे. हा प्रोमो पाहून नेटकरी हैराण झालेले दिसत आहेत. या व्हिडिओवर कमेंट करत आता प्रेक्षक या प्रोमोबद्दल नापासंती व्यक्त करताना दिसत आहेत.

Story img Loader