Aai Kuthe Kay Karte : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. येत्या ३० नोव्हेंबरला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. मालिका आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. या मालिकेत नेहमीच अनिरुद्ध आणि संजना अरुंधतीला त्रास देताना दिसतात. अशात आता संजना असा काही कट रचणार आहे ज्याने अरुंधतीचा आवाज बंद होण्याची शक्यता आहे. मालिकेचा एक प्रोमो व्हि़डीओ नुकताच समोर आला आहे. त्यामध्ये संजना अरुंधतीसाठी पुन्हा एक कट रचत असल्याचं दिसत आहे.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत यशला नुकतीच एका मोठ्या नवीन चित्रपटासाठी म्युझिक कंपोजरची ऑफर मिळाली आहे. तसेच या प्रोजेक्टमधील सर्व गाणी अरुंधती गाणार आहे. अरुंधतीच्या गाण्याची उद्या रेकॉर्डिंग आहे. मात्र, त्याआधी संजना अरुंधतीच्या मार्गात विघ्न आणते. प्रोमोमध्ये दिसत आहे की, अरुंधती अनघासाठी दूध घेऊन जाते, त्यावेळी ती दुधाचा एक ग्लास स्वत:साठीदेखील भरून किचनवर ठेवते. अनघासाठी दूध घेऊन गेल्यावर संजना तिथे येते. तिला समजतं की, अरुंधतीने हे दूध स्वत:साठी ठेवलं आहे, त्यामुळे संजना या दुधामध्ये एक औषध मिक्स करते. दुधात औषध मिक्स केल्यानंतर ती अनिरुद्धकडे जाते आणि त्याला याबद्दल सांगते. संजना म्हणते की, “उद्या अरुंधतीच्या गाण्याचं फायनल रेकॉर्डिंग आहे. विचार कर, जर उद्या तिचा आवाजच फुटला नाही तर?” संजनाच्या या प्रश्नावर अनिरुद्ध म्हणजे नेमकं काय? असं तिला विचारतो. त्यावर संजना सांगते, “मी अरुंधतीच्या दुधाच्या ग्लासमध्ये असा पदार्थ घातला आहे, ज्याने तिचा आवाजच बंद होईल.”

gharoghari matichya chuli fame Reshma Shinde share kelvan photos
फुलांची सुंदर सजावट, पंचपक्वान्न, आहेर अन्….; मराठी कलाकारांनी रेश्मा शिंदेचं ‘असं’ केलं केळवण, अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
namrata sambherao writes romantic post for husband Yogesh sambherao
“आयुष्यभर असाच रुबाबदार…”, नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची रोमँटिक पोस्ट! म्हणाली…
Popular director Chandrakant kanse share special post for actor Sameer paranjape
“लाज लज्जा सोडून, कोणाची ही तमा न बाळगता…”, समीर परांजपेसाठी लोकप्रिय दिग्दर्शकाने लिहिलेली पोस्ट होतेय व्हायरल, वाचा
gharoghari matichya chuli fame reshma shinde will get marry kelvan photos viral
मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात; केळवणाचे फोटो आले समोर
Maharashtra Assembly Election analysis by girish kuber
Video: “दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादीच्या आमदारांची २०१९ च्या तुलनेत बेरीज वाढली तर…”, वाचा, गिरीश कुबेर यांचे विश्लेषण
Muramba
Video: रेवाच्या हातात बेड्या ठोकण्यासाठी रमा-अक्षय सज्ज; ‘मुरांबा’चा प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले, “देव करो आणि आता…”
“वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा…”, ‘अंतरपाट’ मालिकेत झळकलेल्या अभिनेत्रीची पतीसाठी खास पोस्ट, म्हणाली…

हेही वाचा : “तुम्ही कायम माझ्या हृदयात…”, ऐश्वर्या राय-बच्चनची वडील आणि आराध्यासाठी खास पोस्ट; नेटकरी म्हणाले, “एक स्त्री म्हणून तुझा अभिमान…”

मालिकेत अरुंधतीच्या गाण्याचे अनेक चाहते आहेत. अरुंधतीने अनेक कार्यक्रमांमध्ये गाणं गायलं आहे. तिच्या गोड गळ्याचं प्रत्येकाकडून कौतुक होतं. अशात उद्या अरुंधतीच्या गाण्याचं रेकॉर्डिंग आहे, त्यामुळे चाहत्यांना याची उत्सुकता असताना संजना अरुंधतीच्या मार्गात अडथळा बनून उभी आहे, त्यामुळे अरुंधतीचा आवाज खरच बंद होणार का? हे उद्याच्या भागात पाहता येणार आहे.

ईशा आणि अनिश पुन्हा एकत्र राहणार

मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याने यातील अनिश आणि ईशा यांच्या नात्यातील दुरावादेखील मिटला आहे. गेल्या काही दिवसांपासून ईशाचे अनिशबरोबर सतत वाद होत होते, त्यामुळे या दोघांनीही वेगळं राहण्याचा निर्णय घेताल होता. मात्र, आता त्यांनी पुन्हा एकदा एकमेकांना समजून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा…”, ‘अंतरपाट’ मालिकेत झळकलेल्या अभिनेत्रीची पतीसाठी खास पोस्ट, म्हणाली…

दोघेही एकत्र राहणार असल्याने सुलेखा ताई स्वत: ईशाला घेऊन जाण्यासाठी देशमुखांच्या घरी पोहचल्या. तसेच अनिश आणि ईशाने घेतलेला निर्णय सर्वांना सांगितला. आपली मुलगी पुन्हा सासरी आनंदाने नांदणार हे ऐकून अरुंधतीबरोबर आजी आणि अप्पा यांनाही फार आनंद झाला.