स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षक आवडीने पाहतात. या मालिकेतील देशमुख कुटुंब प्रेक्षकांना आपलंसं वाटतं. अरुंधतीप्रमाणेच मालिकेतील इतर पात्रांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. यातील अरुंधती आणि संजना ही पात्र प्रेक्षकांच्या जास्त पसंतीस पडली आहे. मालिकेत ही पात्र एकमेकांच्या विरोधात असली तरी आता एका कार्यक्रमात धमाल मस्ती करताना दिसून येणार आहेत.
स्टार प्रवाह वाहिनीवर ‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमात अरुंधती म्हणजे मधुराणी प्रभुलकर आणि संजना म्हणजे रुपाली भोसले, मिलिंद गवळी असे कलाकार दिसून आले. या कार्यक्रमात त्यांनी धमाल मज्जा मस्ती करताना दिसले आहेत. वाहिनीने या कार्यक्रमाचा प्रोमो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात दोघीनी एक मजेशीर स्किट सादर करताना दिसत आहे. १२, १३ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर हा कार्यक्रम प्रेक्षकांना बघता येईल.
सध्या या मालिकेत विविध ट्वीस्ट पाहायला मिळत आहेत. या मालिकेत अरुंधती आणि संजनामध्ये सतत काही ना काही वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत होते पण खऱ्या आयुष्यात त्या दोघीही एकमेकींच्या फार खास मैत्रिणी आहेत. रुपाली सोशल मीडियावरदेखील सक्रीय असते. काही दिवसांसाठी मधुराणीने या कार्यक्रमामधून ब्रेक घेतला होता. आता अरुंधतीच्या येण्याने मालिकेमध्ये कोणता नवा ट्विस्ट येणार हे पाहणंही रंजक ठरेल.