छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते या मालिकेतील कलाकार विविध कारणांनी चर्चेत असतात. या मालिकेत अभिनेत्री अश्विनी महांगडे ही अनघा हे पात्र साकारत आहे. अश्विनी ही कायमच तिच्या खासगी आयुष्यातील गोष्टी सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. नुकतंच अश्विनीच्या भावाने दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर ट्रॅक्टर खरेदी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अश्विनीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत अश्विनी ही ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. यावेळी तिच्या आजूबाजूला तिचे कुटुंबीय दिसत आहे. अश्विनीचा भाऊ बद्रीनाथ महांगडे याने नवीन ट्रॅक्टर खरेदी केला आहे.
आणखी वाचा : “गाठी सोडवून देणारा तो माणूस आयुष्यात राहिला नाही…” कुशल बद्रिकेच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाला “फटाके प्रदूषणाचा…”

“स्वराज्य…. भावाने ट्रॅक्टर घेतला….. नाना….आम्ही स्वराज्य #वाढवू आणि #टिकवू सुद्धा….. बद्री #bro_sis #आनंदाची व्याख्या हीच की भाऊ प्रगती करतोय”, असे कॅप्शन तिने या व्हिडीओला दिले आहे. या पोस्टबरोबर तिने आणखी एक व्हिडीओ शेअर करत ट्रॅक्टर खरेदी करण्याची संपूर्ण प्रक्रिया दाखवली आहे.

आणखी वाचा : “मिस्टर भावे ‘तुला पाहते रे’ ही मालिका…”, दक्षिण आफ्रिकेतील व्यक्तीचा सुबोध भावेला मेसेज, अभिनेता म्हणाला “अनेकांकडून…”

दरम्यान अश्विनीच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत तिचे आणि तिच्या भावाचे अभिनंदन केले आहे. तर काहींनी तिला ट्रॅक्टर चालवताना पाहून तिचे कौतुक केले आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.