‘आई कुठे काय करते’ या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेचे नुकतेच तब्बल १ हजार भाग पूर्ण झाले. डिसेंबर २०१९ मध्ये या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सुरुवातीपासूनच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं होतं. अजूनही ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अग्रेसर असून आज तीन वर्षांनंतरीही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेत संजनाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रुपाली भोसलेने या निमित्ताने एक खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत रुपालीने सर्व प्रेक्षकांचे, मालिकेतील सहकलाकारांचे आणि टीममधील इतरांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा : Video : “…आणि फुगड्या सुरू झाल्या”, अभिनेत्रीने शेअर केला ‘बाईपण भारी देवा’च्या शूटिंगचा पडद्यामागचा व्हिडीओ

Milind Gawali
“त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
video of a guy Heartwarming Answer
“बहिण का स्पेशल असते?” तरुणांनी दिले सुंदर उत्तर, प्रत्येक भावाने पाहावा हा VIDEO
Shruti Haasan With Parents
“लोक माझ्याकडे बोट दाखवायचे अन्…”, प्रसिद्ध अभिनेत्री घटस्फोटित आई-वडिलांना म्हणाली ‘हट्टी’
Milind Gawali
“या पाच वर्षांत…”, ‘आई कुठे काय करते’मधील भूमिकेबद्दल मिलिंद गवळींचे मोठे वक्तव्य; म्हणाले, “अनिरुद्धला…”
Viral video of a daughter dancing in the hospital where her mother is admitted craze for reel
अशी मुलगी नसलेलीच बरी! आई रुग्णालयात दाखल असताना पोटच्या पोरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील संजनाच्या भूमिकेमुळे आज रुपाली भोसले घराघरांत लोकप्रिय आहे. सेटवरच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री लिहिते, “‘आई कुठे काय करते’ या मालिकेचे १ हजार भाग पूर्ण झाले आहेत. एखाद्या प्रोजेक्टला एवढं प्रेम मिळणं ही कलाकारांसाठी खूप मोठी गोष्ट असते. राजन शाही या आमच्या निर्मात्यांकडून टीम वर्क म्हणजे काय असतं हे मला कळालं. ‘प्रोडक्शन हाऊस’ यातील ‘हाऊस’ शब्दाचा खरा अर्थ आमच्या मालिकेच्या प्रोडक्शनला कळाला आहे. या मालिकेचा मी एक भाग आहे याचा खरंच खूप जास्त अभिमान वाटतोय.”

हेही वाचा : “अजिबात सोपं नाही…”, सुश्मिता सेनने सांगितला मराठी कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव, म्हणाली, “ते सगळे…”

रुपाली भोसले पुढे लिहिते, “नमिता वर्तक या माझ्या मैत्रिणीचे मला संजना दिल्याबद्दल खूप खूप आभार…तुला दिलेला शब्द मला आजही लक्षात आहे. मी संजना कायम त्याच प्रेमाने आणि प्रामाणिकपणे लोकांसमोर सादर करेन. तू माझ्यावर ठेवलेला विश्वास हाच माझा खूप मोठा आधार आहे. आज १ हजार भाग पूर्ण होऊनही आमची टीम पहिल्या दिवसासारखी काम करत आहे. म्हणूनच लोकांना ही मालिका आपलीशी वाटते.”

हेही वाचा : Video : दिशा पाटनीच्या कथित बॉयफ्रेंडने हातावर काढला तिच्या चेहऱ्याचा टॅटू; नेटकरी म्हणाले, “आता टायगर श्रॉफ…”

“रवी करमरकर यांचा नेहमी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असतो. ही गोष्ट खरंच कमाल आहे. सुबोध भरे तुझ्याबद्दल मी काय बोलू? आज संजना तुझ्यामुळे लोकप्रिय आहे. पण संजनाला मोठं करण्यात तुझा खूप मोठा हातभार आहे…याच सगळं श्रेय तुला आहे. तुषार विचारेमुळे आज लोकांना मालिका ऐकावीशी वाटते. प्रत्येक वाक्य, भावना यावर तू काम करतो. बऱ्याचदा संपूर्ण डोलारा सांभाळून तू कुठे काही कमी पडणार नाही ना? याची काळजी घेतोस. या सगळ्यांसह संपूर्ण टीम, सहकलाकारांचे खूप खूप आभार…१ हजार भाग पूर्ण झाले आता पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम!” असं रुपाली भोसलेने पोस्टमध्ये लिहिलं आहे.