स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. या मालिकेत अरुंधतीची सर्वात जवळची आणि लाडकी मैत्रीण म्हणजे देविका. यात देविका हे पात्र अभिनेत्री राधिका देशपांडे साकारत आहे. नुकतंच राधिकाने सरकारी अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणावर संताप व्यक्त केला आहे.

राधिका देशपांडे ही सध्या ‘सियावर रामचंद्र की जय या बाल-महानाट्य’ प्रयोगात व्यस्त आहे. त्याबरोबर ती सध्या बालनाट्य शिबिरासाठी हॉल शोधण्यात व्यस्त आहे. यानिमित्ताने शासनाचा असलेला हॉल सवलतीच्या दरात मिळावा, यासाठी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने प्रयत्न करत आहे. पण कामचोर, बेजबाबदार कर्मचाऱ्यांमुळे तिला अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आणखी वाचा : “कशाला पाहिजे टिकली फिकली…” मराठी अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
supriya sule News
Supriya Sule : संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन सुप्रिया सुळेंचे सरकारला नऊ प्रश्न; म्हणाल्या, “वाल्मिक कराड…”
trinidha rao nakkina apologize anshu ambani
आधी अभिनेत्रीच्या शरीराबद्दल केलं आक्षेपार्ह विधान, नंतर दिग्दर्शकाने मागितली माफी; अंशू अंबानी प्रतिक्रिया देत म्हणाली…
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ, “सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही संध्याकाळी…”
Rahul Gandhi in veer Savarkar defamation case
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणात राहुल गांधींना जामीन

राधिकाने नुकतंच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यात धूळ खात असलेल्या फाईल्स, कागदपत्रांचा जमा झालेला गठ्ठा आणि बऱ्याच गोष्टी पाहायला मिळत आहे. त्याला कॅप्शन देत राधिकाने सरकारी कामकाजावर संताप व्यक्त केला आहे.

राधिका देशपांडेची पोस्ट

चार कागद, दोन सह्या, एक शिक्का

ताजे टवटवीत फोटो आहेत, फोटो फाईल्स मधून खेचून बाहेर काढले आहेत, खास व्हायरल मटेरियल आहेत त्यामुळे फिल्टर्स मारायची गरज नाही. तुमच्या फोन मधे दिसल्यावर पेस्ट कंट्रोल करून घ्या.

“देश बदल रहा है, तरक्की हो रही है”, ती खास करून शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची. वाह! डोळ्यात पाणी आलं हो माझ्या दृश्य बघून. इतकी देखणी आरास मांडली होती, पायघड्या घातल्या होत्या माझ्या स्वागतासाठी.

विषय साधा होता. मी सध्या बालनाट्य शिबिर घेण्यासाठी हॉल शोधते आहे. मी आणि आमची संस्था काही मोठी नाही. सरकारी बाबू लोकांसमोर तर आम्ही चिल्लर पार्टी. थुकरट वाडीतील कोणीतरी “चल हट” म्हणून बाजूला करण्या जोगे. तसा फील देणारे एक्स्पर्ट मंडळी तुम्हाला भेटतील. तिथे पिसाळ आणि मोहिते आहेत त्यांनी मला उभं पण केलं नाही, बसा म्हणतील अशी अपेक्षा धरायला मी काही वेडी नाही. मूर्ख ठरू शकते कारण काम होईल अशी भाबडी आशा बाळगून मी गेले होते.

२४ मार्च ला अर्ज भरला, शिफारस केली, चकरा मारल्या पण दगडी माणसं सगळी, धुळीत काम करून मूठभर मास चढलेल्या माणसांवर काय परिणाम होणार? सध्या वरून कोणाचा आदेश पाळण्याची जबरदस्ती नाही, त्यासाठी खुर्चीचा आवाज होईल इतकी तरी हालचाल करावी लागते. असो.

आज १८ एप्रिल. शासनाचा असलेला हॉल सवलतीच्या दरात मिळावा असे वाटले होते. पण ना आपणहून कागद हलले, ना कधी मिळेल हे कळले, ना भाडं किती बसेल हे सांगण्यात आले. काहीच घडले नाही. नाकावरची माशी हलली नाही का भुवया उंचावल्या नाहीत. कोण घेईल तेवढे कष्ट! मुजोरी तर राजवाड्यातल्या तिजोरी एवढी. खूप पाहिलेत, खूप भेटलेत, पण ह्यांना माफी नाही. कामचोर, बेजबाबदार कर्मचाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. शासन केलंच पाहिजे.

मी माघार घेतला, हार मानली नाही. माझी मुलं आणि मी नाटक करणार, हॉल मिळणार, दणदणीत प्रयोग आम्ही करणार पण माझ्या सकट बाल कलाकारांसाठी ज्यांनी हॉल उपलब्ध करून दिला नाही, त्रास नाही तर छळ केला त्यांना हे उद्याचे नागरिक धडा शिकावल्याशिवाय राहणार नाहीत. *मुद्दाम नाव घेऊन लिहिते आहे. ही माझी बाजू आहे. गोष्टीची दुसरी बाजू असू शकते.

चार कागद, दोन सह्या, एक शिक्का, असे तुमचेही अनुभव आहेत का? ढिगाऱ्यात कागद, सह्या, शिक्के, आशा, अपेक्षा, आकांक्षा खितपत, कुजत, खुंटीवर लटकलेले सापडतील. त्यांचीच रचलेली होळी तुम्ही पहायची, पेटणार नाही कारण पेट घ्यायला काटक्या, रॉकेल, काडीपेटी ते आणताहेत, पण वेळ लागेल. सोपं वाटलं काय! एक करा. सगळ्यावर पाणी फेरा, नाहीतर तोंड उघडा, शाब्दिक का असेना एक बुक्का नक्की हाणा, असे राधिका देशपांडे म्हणाली.

आणखी वाचा : “‘बाई, बूब्स आणि ब्रा’ पोस्टनंतर मला एका लग्न झालेल्या पुरुषाने फोन केला अन्…” हेमांगी कवीने सांगितला ‘तो’ किस्सा

दरम्यान राधिकाने ही पोस्ट करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिपक केसकर यांसह अनेकांना टॅग केली आहे. त्यावर अद्याप कोणीही काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Story img Loader