मधुराणी प्रभुलकर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘स्टार प्रवाह’वरील आई कुठे काय करते या मालिकेतून मधुराणी घराघरांत पोहचली. या मालिकेमध्ये तिने अरुंधती हे पात्र साकारले आहे. प्रेक्षकांकडून या पात्राला खूप प्रेम मिळते. मधुराणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. निरनिराळे व्हिडीओ आणि फोटो शेअर करीत ती चाहत्यांच्या संपर्कात असते.
हेही वाचा- ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेत्रीने गोव्यात सुरू केला नवा व्यवसाय; म्हणाली, “आमचं छोटंसं घर आता…”
‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या टीमने नुकतीच ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय कार्यक्रम ‘आता होऊ दे धिंगाणा’मध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमात ‘झिम्मा २’चे कलाकारही सहभागी झाले होते. या कार्यक्रमातील ‘साडे माडे शिंतोडे’ या खेळामध्ये अरुंधतीला ‘देवाक काळजी रे’ या मराठीतील लोकप्रिय गाण्याच्या ओळी गायच्या होत्या. मात्र, हे गाणे तिला माहीतच नव्हते. या गाण्याची एकही ओळ तिला नीट गाता आली नाही. त्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.
अरुंधतीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. एकाने कमेंट करीत लिहिले, “मराठी कलाकार आहात आणि तुम्हाला मराठी गाणीच माहीत नाहीत.” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, “ही गायिका आहे ना? गाणं गाते आणि एवढं प्रसिद्ध गाणं माहीत नाही.” तिसऱ्याने “एवढं गाणं येत नाही; हे गाणं तर खूप हिट झालं आणि काय तुम्हाला गाणं येत नाही,” अशी कमेंट करीत टीका केली आहे.
हेही वाचा- Video: ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वात अचानक झाला मोठा बदल, सलमान खानने केलं जाहीर
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मधुराणीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तिचा नवीन हेअर कटमधील लूक प्रेक्षकांना बघायला मिळाला होता. अभिनेत्रीच्या या लूकची अनेकांनी प्रशंसाही केली होती. फोटोवर अनेकांनी कमेंट्स करीत हा लूक आवडल्याचं म्हटलं होतं.