स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका टीआरपीच्या यादीत कायमच टॉप १० मध्ये असते. या मालिकेतील काम करणाऱ्या कलाकारांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. याच मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते म्हणजे मिलिंद गवळी. ते या मालिकेत अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा साकारताना दिसतात. नुकतंच त्यांनी एक खास आठवण सांगितली आहे.
मिलिंद गवळी हे सोशल मीडियावरही कायमच सक्रिय असतात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ ते एका घोड्याच्या तबेल्यात गेल्याचे पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच त्यांनी घोडा या प्राण्याबद्दल भावनाही व्यक्त केल्या आहेत.
आणखी वाचा : प्रत्येकीला वेगळा रंग, ब्लाऊजवर विशिष्ट संदेश अन्…; ‘बाईपण भारी देवा’मधील ‘मंगळागौर’ गाण्यासाठी वापरलेल्या साड्यांची ‘ही’ आहे खासियत
मिलिंद गवळींची पोस्ट
“आनंद
आपल्याला कशात आनंद मिळतो, काय केलं म्हणजे आपण आनंदी असतो, प्रत्येकाच्या आनंदाच्या व्याख्या खूप वेगवेगळ्या असतात, काय ना खाण्यापिण्यामध्ये आनंद मिळतो, काय ना प्रेमाची माणसं भेटली की आनंद मिळतो, काही ना मनासारखे पैसे मिळाले की आनंद मिळतो, मला सुद्धा या सगळ्या गोष्टी जर मिळाल्या तर आनंद मिळतो पण पण तितका नाही जितका मला मनासारखं काम करून मिळतो,मला प्रसन्न माणसं भेटली, निस्वार्थी माणसे भेटली की नक्की आनंद म्हणतो, त्याचबरोबर मला वेगवेगळ्या प्राण्यांना भेटून सुद्धा खूप आनंद मिळत असतो, आणि त्यात घोडा हा प्राणी तो माझ्या फारच आवडीचा आहे, घोड्याला बघितलं तरी मला फार आनंद मिळतो,
अगदी काही वर्षांपूर्वी घोड्याशिवाय प्रवास होऊच शिकायचा नाही जर प्रवास करायचा असेल तर तो फक्त घोड्यावरच करावा लागायचा, त्या काळामध्ये घोडा हा एक फॅमिली मेंबर किंवा कुटुंबाचा भागच असणार नक्कीच,माझे आजोबा म्हणजे माझ्या वडिलांचे वडील श्री अश्रू गवळी हे ब्रिटिशांच्या काळामध्ये पोलीस खात्यामध्ये जमादार होते, आणि त्यांच्याकडे एक घोडा होता, मी फार लहान असताना माझे आजोबा भारी, त्यांच्याकडे असलेला घोडा मी कधी पाहिला नाही, पण माझ्या वडिलांच्या तोंडून मी बरेच वेळेला त्या घोड्याविषयी माझ्या लहानपणापासून ऐकत असे, कळवण तालुक्यामध्ये आबोना या चौकीमध्ये त्यांचं पोस्टिंग होतं, तिकडे घर त्यांनी भाड्याने घेतलं होतं त्या घराच्या मागे तबेला होतात त्या तबेल्यात घोड्याला राहायची व्यवस्था होती, त्या घराचं भाडं होतं दोन रुपये,
माझे आजोबा कसे घोड्यावरून फिरायचे, कसे ते घोड्याची काळजी घ्यायचे, कदाचित तेव्हापासूनच माझ्या बालमनावर घोड्या विषयी कुतूहल निर्माण झाले असावे आणि आपण सुद्धा एक दिवस घोडा घ्यायचा असं कुठेतरी अंतर्मनामध्ये ठरवून टाकलं होतं.
मुंबई शहरांमध्ये राहून आपण घोडा घ्यावा, आणि तो आपल्या बिल्डिंगच्या खाली पार्किंग मध्ये त्याची व्यवस्था करावी,
असं अनेकदा मनामध्ये येऊन गेलं होतं.Practical आयुष्य जगत असताना आपण आपल्या अंतर्मनातल्या सुप्त इच्छा कधीही बाहेर येऊ देत नाही, घोडा घेण्याबाबतीत माझं कदाचित तसंच झालं असावं, पण घोडा हा प्राणी पाहिल्या पाहिल्या माझं मन भरून जातं मला खूप आनंद होतो, तो आनंद काही अंतर्मनात राहत नाही तर तो बाहेरही पडतो, त्या घोड्याशी मैत्री करावीशी वाटते त्या गोड्याशी बोलावसं वाटतं त्याला खाऊ घालावं असं वाटतं त्याच्यावर बसून फेरफटका मारावासा वाटतो, कदाचित त्या आनंदाचाच एक खूप मोठा भाग आहे, घोडा चालवण्याची एकही संधी आजपर्यंत मी सोडली नाही आहे”, असे मिलिंद गवळी यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा : “देवेंद्र फडणवीसांना डोकेदुखीची गोळी तर मोदींना…”, अमोल कोल्हेंचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले “२ कोटी…”
दरम्यान मिलिंद गवळी गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी मराठीसह हिंदी माध्यमांमध्येही काम केले आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली.