स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. या मालिकेतील काम करणाऱ्या कलाकारांना तर प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून धरलं. त्यातीलच एक कलाकार म्हणजे अभिनेते मिलिंद गवळी. या मालिकेत ते अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा साकारताना दिसतात. नुकतंच त्यांनी त्यांच्या एका जवळच्या मित्रासाठी खास पोस्ट केली आहे.

मिलिंद गवळी हे सोशल मीडियावरही कायमच सक्रिय असतात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी त्यांच्या मित्राबरोबरचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केला आहे.
आणखी वाचा : ‘बाईपण भारी देवा’ची जादू कायम, चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांनी खर्च केलेले फक्त ‘इतके’ रुपये

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
Milind Gawali
“या पाच वर्षांत…”, ‘आई कुठे काय करते’मधील भूमिकेबद्दल मिलिंद गवळींचे मोठे वक्तव्य; म्हणाले, “अनिरुद्धला…”
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”

मिलिंद गवळी यांची पोस्ट

“चला माणूस घडवूया”
एका वाघिणीचा छावा .
जसा जिजाऊचा शिवबा.
जो आपल्या मातृभूमीवर, आपल्या देशावर, देशातल्या गोरगरिबांवर, अबाल वृद्धांवर, लहान मुलांवर, जो असीम प्रेम करतो, तो म्हणजे माझा अतिशय जवळचा मित्र वसंत हंकारे,
वसंता हा सांगलीचा राजा आहे.
माझ्या वसंता सारखा वक्ता मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये कधीही पाहिलेला नाही, मी वसंताला दहा हजार शो त्यांसमोर चार चार तास बोलताना बघितलेला आहे, या वेळेमध्ये ऐकणाऱ्यांचं आयुष्य बदलताना मी बघितलेला आहे, श्रोत्यांना हसवण रडवणं आणि ते करत असताना पण त्याचं आणि प्रेरणेच कडू औषध त्यांच्या घरी उतरून हा वसंताचा हातखंडा आहे, त्याचं भाषण ऐकत असताना बाया माणसं लहान मुलं इतके बोट धरून धरून हसतात की त्यांच्या जन्मात कधी ते इतके प्रसन्न आणि आनंदी असे नसतील.
त्याचबरोबर ते रडतात पण इतके की आयुष्यभराचं सगळं दुःख ते बाहेर काढतात. आणि मग मोकळ्या मनाने नव्या आयुष्याची सुरुवात करतात.
कशाला प्रेरणा कशी द्यायची असते त्याला प्रोत्साहन कसं द्यायचं असतं त्याला मार्ग कसा दाखवायचा असतो हे वसंताला चांगलं माहिती आहे त्याने खूप मुलांची आयुष्य बदलली आहेत त्यांना योग्य तो मार्ग दाखवलेला आहे.
हे वसंताचं खूप मोठ समाज कार्य आहे.
मुलांना शिकवणारे तर मी असंख्य लोक बघितले आहेत पण शिक्षकांचे डोळे उघडणे, शिक्षकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणे, ज्या मुलांना आपण शिकवतो त्यांच्यासाठी आपल्या काय जबाबदाऱ्या आहेत वरखडपणे शिक्षकांना सांगणे, प्रामाणिकपणे लहान मुलांना घडवण्याची त्यांच्याकडून शपथ ग्रहण करणे, हे वसंता अनेक वर्षापासून करत आला आहे आणि आजही तो करतो आहे,
कारण वसंताला माहिती आहे जर देश घडवायचा असेल तर या लेकरांना घडवून खूप महत्त्वाचा आहे आणि लेकरांना घडवण्यासाठी आपल्याकडे शिक्षक प्रामाणिक असणं फार गरजेचं आहे.
चला माणूस घडवूया हे त्याचं अभियान अनेक वर्षापासून चालू आहे. आपल्या मुलांना डॉक्टर इंजिनियर नंतर करा आधी त्यांना चांगला माणूस म्हणून घडवा हे त्यांनी समाजामध्ये सगळ्यांच्या मनात बिंबवलं आहे,
वसंता कडे “अभिनयातून शिक्षण “याचं पेटंट आहे.
आणि आता नवीन अभ्यास अभियानाला त्यांनी सुरुवात केलेली आहे म्हणजे “चला जगू आनंदाने”.
श्रीकृष्णाचा ज्याला आशीर्वाद आहे, आई सरस्वती ज्याची माता आहे, जो स्वतः एक ऊर्जा, एक राजा, एक वादळ आहे
आणि त्याचा अश्वमेध कधीही थांबणार नाही.
परवा आमची सांगलीत वसंताची भेट झाली, आईनी माझ्या साठी त्याच्याबरोबर भाकरी आणि पिठलं डब्यात बांधून दिलं, पोट आणि मन भरून गेलं ,
ती ऊर्जा आणि प्रेम घेऊन पुन्हा काम करण्यासाठी ठाण्यात पोचलो”, असे मिलिंद गवळी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : “शिर्डीच्या साईबाबांनी नवसाने मुलगा दिला, मुंबईच्या महालक्ष्मीने मुंबईत…” मिलिंद गवळींची भावूक पोस्ट

दरम्यान मिलिंद गवळींच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. मिलिंद गवळी गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी मराठीसह हिंदी माध्यमांमध्येही काम केले आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली.