‘आई कुठे काय करते’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील देशमुख कुटुंब प्रेक्षकांना आपलंसं वाटतं. अरुंधतीप्रमाणेच मालिकेतील इतर पात्रांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. गौरी आणि यश यांच्यात अमेरिकेला जाण्यावरुन दुमत असताना आता यशच्या अत्यंत जवळची व्यक्ती संकटात सापडणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. मालिकेतील अप्पा हे पात्र किशोर महाबोले साकारत आहेत. गौरी अमेरिकेला जाण्यावरुन यश आधीच नाखूश असल्याचं पाहायला मिळत आहे. यातच आता यशच्या अत्यंत जवळचे असणारे अप्पाही संकटात सापडणार आहेत. मालिकेतील एक प्रोमो व्हिडीओ स्टार प्रवाहच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा >> राखी सावंत शर्लिन चोप्राला म्हणाली चेटकीण अन्…; साजिद खानवरुन सुरू झालेल्या वादात दोघींची कॅट फाईट

मालिकेतील या व्हिडीओमध्ये कांचन आजीचा भाऊ आणि अप्पा बाहेर गेलेले असतात. अप्पांच्या स्मृतीभंशाच्या आजारामुळे त्यांना फारसं काही आठवत नसल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. पाने घेऊन येतो असं सांगून अप्पा घराबाहेर पडतात ते बराच वेळ होऊनही घरी परततच नाहीत. कांचन आजीचे भाऊ ही गोष्ट घरातल्यांना सांगतात, तेव्हा सगळ्यांना अप्पांची चिंता वाटू लागते. अप्पा रस्त्यावरुन चालत असताना अचानक समोरुन गाडी आल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. त्यानंतर आशितोष यशला “मृतदेहाजवळ अप्पांचं पाकीट मिळालं आहे. याशिवाय मृतदेहाचं वर्णनही अप्पांशी मिळत जुळत आहे”, असं म्हणत असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

हेही वाचा >> विराट कोहलीचा बेडवरील ‘तो’ फोटो पोस्ट करत अनुष्काने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाली…

हेही वाचा >> चिरंजीवींसह उर्वशी रौतेला आयटम सॉंग करताना दिसणार, ‘वॉल्टेयर वीरैया’ चित्रपटात दाखवणार जलवा

‘आई कुठे काय करते’ मालिकेत अप्पांचा खरंच अपघात होणार की ते सुखरुप घरी परत येणार? हे येणाऱ्या भागांतच कळणार आहे. मालिकेतील या व्हिडीओमुळे चाहत्यांनाही पुढे काय होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aai kuthe kay karte serial update appa vinayak deshmukh meet with an accident video kak