सध्या मराठी मालिकाविश्वात जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेऊन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. लवकरच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही नवी मालिका भेटीस येत आहे. अभिनेत्री ईशा केसकर आणि अभिनेता अक्षर कोठारी यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका २० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे सध्या दुसऱ्याबाजूला ‘आई कुठे काय करते’ किंवा ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ यापैकी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. पण यावर आता ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अनिरुद्ध म्हणजे अभिनेते मिलिंद गवळी यांनी भाष्य केलं आहे.

हेही वाचा – “…आणि तो अद्भुत प्रवास संपला” शंकर महाराजांची भूमिका साकारलेल्या संग्राम समेळची भावुक पोस्ट, म्हणाला…

punha kartvya aahe
Video: “तुम्ही कितीही दूर…”, वसुंधराने केला सासूचे मन जिंकण्याचा निर्धार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत नवीन वळण, पाहा प्रोमो
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
aai kuthe kay karte fame actress kaumudi walokar grahmakh photos viral
लगीनघाई! ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्रीचा ग्रहमख विधी पार पडला, फोटो आले समोर
Lakaht Ek Aamcha Dada
Video : “गावासमोर धिंड काढली नाही, तर…”, तुळजाचे डॅडींना चॅलेंज; नेटकरी सल्ला देत म्हणाले, “काहीही करून तुमचं नातं…”
tula shikvin changalach dhada marathi serial akshara is pregnant
“अधिपतीचं मूल अक्षराच्या पोटात वाढतंय…”, भुवनेश्वरीसमोर येणार रिपोर्ट्स, अक्षरा आई होणार! मालिकेत मोठा ट्विस्ट, पाहा प्रोमो
Paaru
“मी सगळ्यांना बरबाद…”, दारूच्या नशेत अनुष्का पारूला सत्य सांगणार; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
Aai Kuthe Kay Karte Fame Actress Kaumudi Walokar
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई! मालिकेतील कलाकारांनी केलं केळवण, सुंदर सजावटीने वेधलं लक्ष

‘लोकसत्ता ९९९’ या कार्यक्रमात अभिनेते मिलिंद गवळी आणि अभिनेत्री रुपाली भोसले हे दोघं सहभागी झाले होते. यावेळी मिलिंद गवळी यांनी ‘आई कुठे काय करते’ ही मालिका बंद होणार की नाही? याविषयी स्पष्टच सांगितलं. ते म्हणाले, “‘आई कुठे काय करते’ ही मालिका संपणार नाही. मी जर प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलं तर तुम्ही मला काढून टाकणार का?, नाही. आता जे सुरू झालंय ते कधीना कधी तरी संपणारच आहे. जन्माला आलोय तर मृत्यू हा अटळच आहे. त्याचप्रमाणे मालिकांचं असतं. अजून ‘आई कुठे काय करते’ मालिकेची गोष्ट पूर्ण झाली नाहीये. त्यामुळे जोपर्यंत गोष्ट पूर्ण होत नाही, तोपर्यंत ती मालिका बंद होत नाही. शिवाय लोकं बंद करू देणार नाहीत.”

हेही वाचा – “भक्तांचा अपमान…”, ‘योगयोगेश्वर जय शंकर’ मालिका अचानक बंद; प्रेक्षकांनी केला संताप व्यक्त, म्हणाले….

पुढे मिलिंद गवळी म्हणाले की, “आज टीआरपीमध्ये आमची मालिका ४.७ ते ६.० आहे. याचाच अर्थ टेलिव्हिजन पाहणारी अर्धी लोक ‘आई कुठे काय करते’ ही मालिका पाहतात. त्यामुळे बघणाऱ्या मालिकांना बंद करत नाहीत. गोष्ट अजून सांगायची आहे. खरंतर आता संजना आणि अनिरुद्धचं नातं सुरू झालंय.”

हेही वाचा – अभिनेत्री जुई गडकरीला चिडवतात ‘गाववाली’? का ते जाणून घ्या..

मिलिंद गवळींच्या या वक्तव्यानंतर ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे. पण सध्या ९.३० या वेळेत सुरू असलेली मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही बंद होणार? की नव्या वेळेत भेटीस येणार? किंवा दुसरी कुठली ‘स्टार प्रवाह’वरील मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार? या सर्व प्रश्नांची उत्तर येत्या काळातच स्पष्ट होतील.

Story img Loader