Aai Kuthe Kay Karte Star Pravah Marathi Serial : जवळपास पाच वर्ष रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यावर ‘आई कुठे काय करते’ ही लोकप्रिय मालिका आता सर्वांचा निरोप घेणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेतील कलाकार सेटवरच्या आठवणी, भावुक क्षण, कलाकारांची एकमेकांबरोबर झालेली मैत्री, मालिकेतील समृद्धी निवास याबद्दलचे अनेक किस्से प्रेक्षकांना सांगत आहेत.

शेवटच्या एपिसोडचं शूट करताना मालिकेच्या सेटवर सुद्धा भावुक वातावरण झालं होतं. पण, अंतिम भागात नेमकं काय घडणार? सगळं गुण्या-गोविंदाने पूर्वपदावर येणार का याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली होती. त्याचं उत्तर आता समोर आलं आहे.

daredevil series trailer release
Video: जबरदस्त अ‍ॅक्शन आणि थरारक स्टंट; मार्व्हलच्या Daredevil: Born Again चा ट्रेलर प्रदर्शित
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Tula Shikvin Changlach Dhada
Video: “सूनबाई जर…”, भुवनेश्वरीमुळे अधिपतीला भेटण्याची अक्षराची इच्छा अपूर्ण राहणार का? मालिकेत पुढे काय घडणार?
Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Premachi Goshta Fame Apurva Nemlekar dance on Rekha song in ankhon ki masti
Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ
Mahakumbh First Amrit Snan on makar Sankranti
महाकुंभातील पहिल्या अमृतस्नानाचं महत्त्व काय? मकर संक्रांतीच्या दिवशीच याचे आयोजन का केले जाते?
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Punha kartvya ahe
Video : “आता शिक्षेला…”, वसुंधरा व तनयाला जलसमाधी घ्यावी लागणार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’मध्ये काय घडणार?

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ फेम सायलीचं शिक्षण माहितीये का? मिळवलंय Gold Medal; उच्चशिक्षित जुई अभिनयाकडे कशी वळली?

‘स्टार प्रवाह’ वाहिनीने ‘आई कुठे काय करते’ ( Aai Kuthe Kay Karte ) मालिकेच्या शेवटच्या भागाचा प्रोमो प्रेक्षकांबरोबर शेअर केला आहे. या प्रोमोत संपूर्ण देशमुख कुटुंबीय समृद्धी निवासमध्ये एकत्र जमल्याचं पाहायला मिळत आहे. अरुंधती अनिरुद्धला भरल्या घरात चांगलंच सुनावणार आहे.

अरुधंती म्हणते, “अनिरुद्ध तुम्हाला तुमचे आई-वडील, तुमची मुलं, तुमची बायको, तुमचं घर यातचं काहीच सांभाळता आलेलं नाही आणि वाट्याला काय आलं हा तुमचा समृद्धी घराचा हिस्सा. ( अनिरुद्ध प्रॉपर्टीवर दावा केलेला असतो ) फुल्ल अँड फायनल” यानंतर प्रॉपर्टीचे कागद घेऊन अनिरुद्ध त्याच्या खोलीच्या दिशेने निघतो. यावर अरुंधती त्याला अडवते आणि म्हणते, “आता तुमची जागा इथे नाहीये अनिरुद्ध…घराबाहेर आहे. आठवतंय का काही? शेवटी नियतीने तुम्हाला तुमची पातळी दाखवली.”

हेही वाचा : विवेक ओबेरॉयने खरेदी केली आलिशान रोल्स रॉयस! वडिलांच्या हाती सोपवली नव्या गाडीची किल्ली; किंमत ऐकून थक्क व्हाल…

अरुंधती हळुहळू अनिरुद्धला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ घेऊन जाते. त्याच्या मागेच संजना असते. यादरम्यान, अनिरुद्धच्या डोक्यात अरुंधतीला घराबाहेर काढल्याचा प्रसंग फ्लॅशबॅक होत असतो. पुढे अनिरुद्ध घराबाहेर पाऊल टाकताच अरुंधती त्याला सांगते, “आता यापुढे कोणाची विचारायची हिंमत होणार नाही की, आई कुठे काय करते” एवढं बोलून अरुंधती अनिरुद्धच्या तोंडावर घराचा दरवाजा लावून घेते.

दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ ( Aai Kuthe Kay Karte ) मालिकेचा हा विशेष भाग ३० नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता प्रसारित केला जाणार आहे.

Story img Loader