Aai Kuthe Kay Karte: लोकप्रियतेचं शिखर गाठलेली ‘आई कुठे काय करते’ मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ३० नोव्हेंबरला मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. गेली पाच वर्ष ‘आई कुठे काय करते’ मालिकेने प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन केलं. या मालिकेत अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने अरुंधती ही मध्यवर्ती भूमिका उत्कृष्टरित्या साकारली. त्यामुळेच अरुंधती महिलांसाठी आयडॉल झाली. या अरुंधती भूमिकेने मधुराणीला काय दिलं? जाणून घ्या…

‘स्टार प्रवाह’च्या इन्स्टाग्राम पेजवर नुकताच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये अरुंधती या भूमिकेने काय दिलं? याविषयी मधुराणी सांगताना दिसत आहे. मधुराणी प्रभुलकर म्हणते, “अरुंधती माझ्या आयुष्यासाठी दिशादर्शक आहे, असं मी म्हणेन. ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधती साकारायच्या आधीची मधुराणी आणि आताची मधुराणी यात खूप मोठा आणि चांगला बदल आहे. तो नेम फेम या गोष्टीतला नाहीये.”

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”

हेही वाचा – Video: अमेरिकेच्या ९० वर्षांच्या आजीनं पाहिलं संदीप पाठकचं ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ नाटक, अभिनेत्याचं कौतुक करत म्हणाल्या…

पुढे मधुराणी प्रभुलकर म्हणाली, “एखादी भूमिका आपल्याला आतून शक्ती देते, उजळवून टाकते. एक नवा विचार देते. हा अनुभव मी पाच वर्ष घेत आले. नमिता नाडकर्णी आणि मुग्धा गोडबोले या अत्यंत पॉवर फुल दोन लेखिका आहेत; ज्यांनी ती भूमिका इतकी पॉवर फुल केली आणि ग्राफ होता. अत्यंत साधी स्त्री एक-एक टप्प्यांनी सक्षम होत जाणारी स्त्री. जशी अरुंधती वेगवेगळ्या पातळीवर मजबूत होतं गेली. तिला जगाचं वेगळं भान यायला लागलं. स्वतःबद्दलच वेगळं भान यायला लागलं. मला असं वाटतं, ते सगळं मधुराणीमध्ये झिरपत गेलं.”

“आज मला लोक ओळखतात. खूप प्रेमाने भेटतात. तेव्हा डोळ्यात त्यांच्या अश्रू सांगतात. त्यांची आई भेटल्याचं त्यांना समाधान मिळत. हे सगळं खूप जबरदस्त आहे. एवढं असं कोणाच्या गळ्यातला ताईत होऊ असा कधी विचार केला नव्हता. इच्छा होती, स्वप्न होतं. पण मला असं वाटतं, माझ्यात झालेले बदल, एक दिशादर्शक म्हणतो किंवा अरुंधती माझ्यासाठी गुरु आहे. फक्त माझ्यासाठी असं नाही. अनेकजण येऊन भेटतात आणि म्हणतात की, अरुंधतीकडून आम्ही शिकतो किंवा वेगवेगळ्या परिस्थिती आपल्या आयुष्यात येत असतात. तर अरुंधती या परिस्थितीत कशी वागेल? असा अनेकदा मी पण विचार करते. तर, हां ती नेहमी शहाण्यासारखी वागते. आपल्याला तसं वागायला हवं. हे अगदी छोटं उदाहरण झालं. हे मी असं नाही अनेकजण म्हणतात,” असं मधुराणी म्हणाली.

हेही वाचा – “पाच वर्ष सुरू असलेला हा प्रवास…”; ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची भावुक पोस्ट, म्हणाली, “लॉकडाऊनमध्ये…”

“गंमत अशी होते की, माझी मुलगी पुण्यात असते. मी मुंबईत असते. आईची भूमिका मी इथे करते. माझी तीन मुलं दाखवली आहेत. सगळ्या जगासाठी मी आई आहे. पण, मी मात्र लॉन्ग डिस्टेंस आई पाच वर्ष आहे. एकीकडे महाराष्ट्राची आई निभावताना माझ्या खऱ्या आईची परीक्षा होती, असं मला वाटतं. कारण, तिच वाढीच वय आणि त्यादरम्यान मी दूर असणं. तरीही ते नातं टिकवून ठेवणं. ही माझ्यासाठी खूप मोठी तारेवरची कसरत होती. कारण एका मुलाला आईची गरज असते. तसंच आईला लेकरांची गरज असते. ती आजूबाजूला असावीत खूप वाटतं. असे खूप क्षण होते. तरीही माझ्या प्रोडक्शन हाउस आणि चॅनेलने खूप सांभाळून घेतलं. दरकाही दिवस शूट केल्यानंतर मला सुट्ट्या मिळत होत्या. स्वरालीला भेटायला. पण त्याही कमी पडायच्या आणि मी गेली पाच वर्ष आईपणाची परीक्षाचं दिली, असं म्हणायला काही हरकत नाही”, असं मधुराणी प्रभुलकर म्हणाली.

हेही वाचा – Bigg Boss 18: दिग्विजय सिंह राठी ‘टाइम गॉड’ होताच विवियन आणि अविनाशचा बंड, ‘बिग बॉस’ने दिग्विजयला दिला विशेष अधिकार

दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ मालिकेची जागा ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही नवी मालिका घेत आहे. २ डिसेंबरपासून दुपारी २.३० वाजता ही नवी मालिका सुरू होणार आहे. या नव्या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते मंगेश कदम प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

Story img Loader