कृष्णा अभिषेकची बहीण व गोविंदाची भाची, अभिनेत्री आरती सिंह तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. ती दिपक चौहानशी लग्न करणार आहे. तिच्या घरी लग्नाची तयारी सुरू झाली आहे. आता तर अभिनेत्रीच्या लग्नाआधीच्या विधींनाही सुरुवात झाली आहे. तिच्या लग्नाआधीच्या विधीतील पहिला फोटो तिचा होणारा पती दिपकने शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिपक चौहानने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आरती सिंहचा फोटो शेअर केला आहे. त्याने अभिनेत्रीचा विधी करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. तिने डोक्यावर ओढणी घेतली आणि ती पूजा करताना दिसत आहे. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये आरती सुंदर दिसत आहे.

आरती सिंहचा फोटो तिच्या पतीने शेअर केला आहे.

याआधी आरती सिंहने तिच्या सजवलेल्या घराचे काही फोटो शेअर केले होते. त्यात फुलांनी घर सजवल्याचं दिसत होतं. आरती मरून कलरच्या साडीत खूप सुंदर दिसत होती. यातील तिचा लूक पाहून अनेकांनी शुभेच्छा दिल्या होत्या. या फोटोंना तिने ‘लाल इश्क’ असं कॅप्शन दिलं होतं.

प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”

आरती सिंहने ई-टाइम्सशी बोलताना सांगितलं की तिची आणि दीपकची भेट एका खासगी मॅचमेकरद्वारे झाली होती. त्यांची पहिली भेट जुलैमध्ये झाली होती, त्यानंतर दोघांनी एकमेकांना समजून घेण्यासाठी काही काळ डेट केलं आणि त्यानंतर यावर्षी १ जानेवारी रोजी दीपकने तिला लग्नासाठी प्रपोज केलं. तिने होकार दिला आणि आता २५ एप्रिल रोजी त्यांचं लग्न आहे.

कडेवर बाळ खेळवताना दिसली गौतमी पाटील, बीचवरचे सुंदर फोटो केले शेअर, वनपीस ड्रेसने वेधलं लक्ष

आरती सिंहच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती ‘बिग बॉस १३’ मध्ये दिसली होती. याव्यतिरिक्त तिने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. आरतीने २००७ मध्ये ‘मायका’ या शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर तिने ‘परिचय’, ‘थोडा है बस थोडा की जरुरत है’ आणि ‘वारिस’ सारख्या शोमध्ये काम केलं. तसेच ती ‘उत्तरन’ आणि ‘देवों के देव महादेव’ मालिकेचा भाग होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aarti singh wedding rituals started husband dipak chauhan shared photo hrc