Aarya Ambekar Post : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमाचं पहिलं पर्व खूपच गाजलं होतं. या पहिल्या पर्वातील कार्तिकी गायकवाड, आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे आणि रोहित राऊत या पंचरत्नांवर जितकं प्रेम प्रेक्षकांनी त्यावेळी केलं होतं, तितकं आजही प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसत आहेत. हे पंचरत्न आजही नेहमी चर्चेत असतात. सध्या या पंचरत्नामधील गायिका आर्या आंबेकरने लिहिलेली पोस्ट व्हायरल झाली आहे. स्वातंत्र्यदिनी आर्याने या पोस्टच्या माध्यमातून आपलं परखड मत व्यक्त केलं आहे. आजूबाजूला घडणाऱ्या चिंताजनक घटनांविषयी तिने भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आर्या आंबेकरने ( Aarya Ambekar ) लिहिलं आहे, “खूपच चिंताजनक बातम्या वाचनात येत आहेत – पुण्यातील अपघात, कोलकाता डॉक्टर प्रकरण, किंवा एका कुटुंबाचे धरणात वाहून जाणे. या घटनांमधील एक सामान्य धागा असा वाटतो की, लोकांनी घाबरणं सोडूनच दिलंय. किंवा लोक भिती व्यक्त करायला reluctant आहेत याची चिंता वाटते.”

हेही वाचा – Video: “प्रवासाला येताय ना?”, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित, नेटकरी म्हणाले, “जबरदस्त”

पुढे गायिकेने लिहिलं, “आजकाल भिती आणि anxiety यासारख्या मूलभूत मानवी भावना सुद्धा चुकीच्या प्रकारे दाखवल्या जात आहेत ( जीवनात आवश्यक असणाऱ्या प्रमाणातल्या भीती व anxiety याबद्दल बोलते आहे). याचा परिणाम म्हणून लोक भिती दाखवायलाच तयार नाहीत. कदाचित वाढती अनियंत्रित वर्तनं याचाच परिणाम असेल का?असं वाटतं शाळांमध्ये एनसीसी सारखे discipline चे आणि मनोविज्ञान शिक्षणाचे, थेरपीचे धडे समाविष्ट करणं आवश्यक झालं आहे. या स्वातंत्र्य दिनी, आपल्याला एकमेकांना असमर्थता व्यक्त करण्याची मुभा देऊ या आणि असमर्थतेला निर्बंधांशिवाय स्वीकारूया.”

हेही वाचा – Bigg Boss Marathi: निक्की-अरबाजच्या मैत्रीत पडला मिठाचा खडा, ‘या’ व्यक्तीमुळे कडाक्याचं भांडण, नेमकं काय घडलं? पाहा

आर्याचे चाहते काय म्हणाले?

आर्याच्या ( Aarya Ambekar ) चाहत्यांनी या पोस्टवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने लिहिलं आहे, “एकदम बरोबर. आर्या तुझा अभिमान वाटतो.” दुसऱ्या चाहत्याने लिहिलं आहे, “लोकांनी घाबरणं सोडून दिलंय हे खरं आहे, पण वेगळ्या दृष्टिकोनातून विचार केला की असं वाटतं हे होण्यामागे माणसाचा आत्मकेंद्रीपणा वाढत चाललाय. त्याला दुसऱ्याची पर्वाच उरली नाहीये.” तसंच तिसऱ्या चाहत्याने लिहिलं आहे, “मुलांवर लहानपणापासूनच शिवचरित्राचे, विविध धार्मिक ग्रंथांचे , मानवतेचे संस्कार केलेच पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्याप्रमाणे गुन्हेगारांना शिक्षा करत तशी शिक्षा पुन्हा करायला पाहिजे. तरच गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भिती निर्माण होईल. शिवविचार आणि शिवशासनचं आता स्त्रियांचं रक्षण करू शकतं.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aarya ambekar write post on pune accident kolkata doctor case pps