Aarya Jadhao Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली स्पर्धक म्हणजे रॅपर आर्या जाधव होय. आर्या बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे, पण प्रेक्षक फक्त तिच्याच बद्दल बोलत आहेत. बिग बॉसने आर्याला घरातून निष्कासित केलं हा निर्णय अनेकांना आवडलेला नाही. अशातच आर्याने मुलाखत दिली असून त्यात तिने बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागच्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सी टास्क झाला होता. या टास्कमध्ये तिचं आणि निक्कीचं भांडण झालं. भांडणानंतर दोघींमध्ये झटापट झाली आणि ‘मी तुला मारेन’ असा इशारा देत आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली. यानंतर बिग बॉसने तिला एक दिवस जेलमध्ये ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी भाऊचा धक्कामध्ये रितेशने त्या प्रसंगाचा सगळा घटनाक्रम सांगितला आणि आर्याला बिग बॉसने निष्कासित केलं.

Video : “जान्हवी तुझे डोळे किती सुंदर आहेत”, अरबाज ‘ते’ विधान ऐकताच निक्की म्हणाली, “बाई मी खूप…”

आर्या-निक्कीच्या वादाला आठवडा उलटला आहे. बिग बॉसच्या घराबाहेर पडलेल्या आर्याला प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय. तिचं अमरावतीत जंगी स्वागत झालं. त्यानंतर आता तिने ‘मुंबई तक’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला बिग बॉस मराठीतील टॉप ५ स्पर्धक कोण? असं विचारण्यात आलं. याचं उत्तर देताना आर्याने फक्त चार नावं घेतली.

Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…

आर्याने निवडलेले टॉप चार सदस्य कोण?

आर्या म्हणाली, “माझे टॉप फाइव्ह.. खरं तर मला पाच नावं माहीत नाही, पण तीन नावं माहीत आहेत. एक वर्षाताई, सूरज आणि अंकिता मला वाटतेय. एक अभिजीत दादाचं नाव मी घेऊ शकते. हे सगळेजण टॉप ५ मध्ये असतीलच असं नाही. पण ही ती नावं आहेत जी मला वाटतं की टॉप ५ मध्ये असावी.”

दरम्यान, मुलाखतीत आर्याने निक्कीच्या गेमवर टीका केली. निक्की वाईट गेम खेळत असल्याचं मत तिने व्यक्त केलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aarya jadhao choose top 5 of bigg boss marathi 5 suraj chavan abhijeet sawant hrc