Aarya Jadhao met Yogita Chavan : मागच्या आठवड्यात बिग बॉसने आर्याला निक्कीला मारल्या प्रकरणी घराबाहेर काढलं. आर्या बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर अमरावतीला गेली होती. तिथे अमरावतीकरांनी तिचं मोठ्या जल्लोषात स्वागत झालं होतं. त्यानंतर मुंबईत परतल्यावर आर्याने बिग बॉसच्या पाचव्या पर्वातील एका स्पर्धक योगिता चव्हाणची भेट घेतली आहे. तिनेच इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.
आर्याने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात ती बिग बॉसच्या पाचव्या पर्वातून सुरुवातीच्या आठवड्यात बाहेर पडलेल्या योगिताला भेटताना दिसते. आर्याने शुक्रवारी मुंबईत योगिताच्या घरी जाऊन तिची भेट घेतली. दोघींच्या भेटीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे.
आर्या योगिताच्या घरी पोहोचल्यावर योगिताचा पती सौरभ चौगुले दार उघडतो. त्यानंतर दोघीही एकमेकींचे व्हिडीओ शूट करत एकमेकींना भेटतात. ‘मला विश्वासच बसत नाहीये, आपण भेटतोय… मी तुला खूप मिस केलं,’ असं आर्या योगिताला म्हणते. त्यानंतर योगिता म्हणते की आपण बिग बॉसच्या घराबाहेर पहिल्यांदाच भेटत आहोत. या दोघींचा बिग बॉसच्या घराबाहेरच्या भेटीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
हेही वाचा – तुझ्यासाठी Bigg Boss Marathi तील टॉप ५ सदस्य कोण? आर्या जाधवने घेतली फक्त ‘ही’ चार नावं, म्हणाली…
पाहा व्हिडीओ –
दरम्यान, आर्या बिग बॉसच्या घराबाहेर निघाली असली तर प्रेक्षक आणि चाहते तिचं खूप कौतुक करत आहेत. निक्कीने घरात खूप जणांचा अपमान केला होता, त्यामुळे आर्याने निक्कीला मारलं ते योग्यच होतं, असं काही जणांचं मत होतं. तर काहींच्या मते आर्याने निक्कीला मारणं चुकीचं होतं. स्वतः आर्यालाही तिने निक्कीवर हात उचलायला नको होता असं वाटतंय. तिने खूपवेळा याची कबुली दिली आहे. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यावर चॅनलने अद्याप संपर्क केलेला नाही. पण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना माझा गेम पाहायला आहे, त्यामुळे बिग बॉसच्या घरात परत जायला आवडेल, असं आर्या एका मुलाखतीत म्हणाली.