Bigg Boss Marathi Aarya Jadhao Rap : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून गेल्या आठवड्यात आर्याने निक्कीला कानशि‍लात लगावल्यामुळे तिला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने आर्याला घडलेल्या घटनेचा जाब विचारला आणि त्यानंतर ‘बिग बॉस’ने अंतिम निर्णय देत तिला घरातून निष्कासित केलं. यावर आर्याच्या चाहत्यांसह नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बाहेरील प्रेक्षकांकडून तिला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे घराबाहेर आलेली आर्या या सगळ्या प्रकरणावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अखेर इन्स्टाग्रामवर लाइव्ह सेशन घेत तिने या संपूर्ण घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सर्वप्रथम तिने महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार मानले. पुढे, घटनाक्रम सांगून झाल्यावर आर्याने ( Aarya Jadhao ) रॅप करत आपलं रोखठोक मत मांडलं आहे.

हेही वाचा : “काकू, आम्ही पण मार खायला नव्हतो गेलो”, घराबाहेर येताच आर्याची पहिली प्रतिक्रिया! निक्कीच्या आईने केलेल्या आरोपांवर दिलं उत्तर

आर्याने रॅपमधून निक्कीला दिलं रोखठोक उत्तर

कभी कपडे फाडे गये, कभी नोचा गया सरे आम
बात बाप तक चली गयी, हम सहेते रहें हाय राम
धक्के की चादर तलें छुपाई तुने वो हिंसा थी
जब देती रही तू घाँव मुझे, तब कहा गयी तेरी चिंता थी
फिर मैंने भी एक गलती की, तुझे तेरी तरह जबाब दिया
मेरे कर्माने मी मुझसे…मेरे दो पल की गलती का हिसाब लिया
पर तेरा भी तो कर्मा हैं…ये तुझको भी तो मिलना हैं
…और देख रही इन जनता इसको हलके मैं तू ले गयी
तू घर तोडते रहे गयी…और मैं दिल जीत के ले गयी!

हेही वाचा : Video : “आर्याने मला मारलं…”, म्हणत निक्की ढसाढसा रडली! घरात जोरदार राडा; थेट ‘बिग बॉस’कडे केली बाहेर काढण्याची मागणी

हेही वाचा : Aarya Jadhao : निक्कीला मारणं पडलं महागात, रितेशने सुनावलं अन् आर्याला बिग बॉसने दाखवला बाहेरचा रस्ता; म्हणाले, “अशा निंदनीय कृत्यांना…”

घरातील घटनेवर आर्या जाधवची प्रतिक्रिया ( Aarya Jadhao )

“जे झालं ते झालं…पण, तुमचा पाठिंबा मला महत्त्वाचा आहे. माझी ट्रॉफी तुम्ही लोक आहात. रॅपर म्हणून मला अनेकजण ओळखतात पण, एक माणूस म्हणून मी कशीये हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे…म्हणून मी या खेळात सहभागी झाले होते. माझ्या पाठिशी असेच कायम उभे राहा. तुमचा सपोर्ट पाहून मला खूपच चांगलं वाटतंय” असं मत आर्याने ( Aarya Jadhao ) मांडलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aarya jadhao rap and angry reaction on nikki tamboli behaviour in bigg boss marathi house watch video sva 00