Aarya Jadhao Reacts on Her Elimination: बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व आधीच्या सर्वच पर्वांपेक्षा खूप गाजत आहे. या पर्वातील स्पर्धकांची भांडणं, टास्कमध्ये होणारी झटापट याची सोशल मीडियावरही खूप चर्चा असते. बिग बॉस मराठीमध्ये मागच्या आठवड्यात झालेल्या कॅप्टन्सी टास्कची सर्वाधिक चर्चा झाली. या टास्कमध्ये रॅपर आर्या जाधवने निक्की तांबोळीच्या कानशिलात लगावली, त्यानंतर आर्याला बिग बॉसने निष्कासित केलं.

आर्या जाधव बिग बॉसच्या घराबाहेर पडली, त्याला एक आठवडा झाला आहे. आर्याने निक्कीला मारल्यावर तिला बिग बॉसने जेलमध्ये टाकलं होतं. त्यानंतर भाऊच्या धक्क्यात तिला घराबाहेर काढलं. निक्कीला मारणाऱ्या आर्याला प्रेक्षकांचा खूप पाठिंबा मिळत होता, आर्याने जे केलं ते बरोबर असल्याचं प्रेक्षक म्हणत होते, त्यामुळे आर्याला कदाचित काही दिवसांनी परत शोमध्ये आणतील अशी शक्यता होती, पण तसं काही घडलं नाही. याबद्दल आर्याला विचारण्यात आलं आहे, त्यावर तिने काय उत्तर दिलं ते जाणून घेऊयात.

aishwarya rai nimrat kaur abhishek bachchan
ऐश्वर्या राय बच्चनने पती अभिषेकसाठी केली पोस्ट, चाहते निम्रत कौरचा उल्लेख करत म्हणाले…
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
What Rahul Solapurkar Said?
Rahul Solapurkar : राहुल सोलापूरकरांनी भांडारकर संस्थेचं विश्वस्तपद सोडलं, शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्यावरील माफीनाम्यानंतर राजीनामा
chaggan bhujbal
..तर धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या- छगन भुजबळ
Yuvraj Singh Message to Abhishek Sharma After Historic Century Reveals His Father
Yuvraj Singh Abhishek Sharma: “हे विसरू नकोस की तुला…” अभिषेक शर्माला शतकानंतरही युवराज सिंगने दिल्या सूचना, अभिषेकच्या वडिलांनी सांगितलं काय होता मेसेज
Shilpa Shirodkar
शिल्पा शिरोडकर ‘बिग बॉस १८’मध्ये गेल्यावर महेश बाबूने पाठिंबा का दिला नाही? अभिनेत्री म्हणाली, “त्यांना गर्विष्ठ…”
mohammed siraj mahira sharma
क्रिकेटपटू मोहम्मद सिराज Bigg Boss फेम अभिनेत्रीला करतोय डेट? तिच्या आईने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, “माझी मुलगी सेलिब्रिटी…”
Dhananjay Munde Beed Guardian Minister
Dhananjay Munde: “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितला तर…”, दिल्लीमध्ये भेटीगाठी घेतल्यानंतर धनंजय मुंडे काय म्हणाले?

हेही वाचा – Bigg Boss Marathi तील सर्वात खरा स्पर्धक कोण? आर्या जाधव ‘या’ सदस्याचे नाव घेत म्हणाली, “शोच्या सुरुवातीपासून…”

तुला परत शोमध्ये घेण्यासाठी चॅनलकडून संपर्क झाला का? असं आर्या जाधवला मुंबई तकच्या मुलाखतीत विचारण्यात आलं. त्यावर आर्या म्हणाली, “अजूनपर्यंत तर नाही.” त्यांनी संपर्क करायला पाहिजे असं वाटतं का? असं विचारल्यावर आर्या म्हणाली, “त्यावेळी माझी डिग्निटी घेऊन मी शोमधून निघाले. पण प्रेक्षक आणि संपूर्ण महाराष्ट्राला असं वाटतंय की मी शोमध्ये जायला पाहिजे. वाईल्ड कार्ड म्हणून जायला पाहिजे, कारण त्यांना माझा गेम पाहायचा आहे. जर प्रेक्षकांना माझा गेम बघायचा आहे, तर मला तो दाखवायला आवडेल. मलाही प्रेक्षकांसाठी बिग बॉस मराठीमध्ये परत जायला आवडेल.”

हेही वाचा – तुझ्यासाठी Bigg Boss Marathi तील टॉप ५ सदस्य कोण? आर्या जाधवने घेतली फक्त ‘ही’ चार नावं, म्हणाली…

बिग बॉस मराठीबद्दल आता बऱ्याच चर्चा होत आहे. पाचवे पर्व १०० दिवस नव्हे तर अवघ्या ७० दिवसात प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. बिग बॉसच्या घरात नुकतीच पत्रकार परिषद झाली, ती पाहूनही नेटकरी हा शो संपणार आहे, अशात कमेंट करत आहेत.

Story img Loader