Bigg Boss Marathi Aarya Jadhao : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात गेल्या आठवड्यात आर्या जाधवने निक्कीच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली. या घटनेनंतर आर्याला सगळं फुटेज तपासून ‘बिग बॉस’च्या टीमने जेलमध्ये टाकलं. तर, या प्रकरणाचा अंतिम निर्णय भाऊच्या धक्क्यावर घेतला जाईल असं जाहीर करण्यात आलं.
रितेश देशमुखने सर्वप्रथम आर्याला तिने केलेल्या कृत्याचा जाब विचारला आणि त्यानंतर तिला बाजू मांडण्याची संधी दिली. आर्याने स्वत: देखील आपल्या हातून चूक झाल्याचं कबूल केलं. या सगळ्या प्रकरणावर ‘बिग बॉस’ने अंतिम निर्णय देत आर्याला घरातून निष्कासित केलं. तिला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यावर आर्याचे चाहते आणि ‘बिग बॉस मराठी’च्या प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. यापूर्वी निक्कीने धक्काबुक्की करणं, नखं मारणं, कपडे खेचणं असे प्रकार केल्याने ती सुद्धा समदोषी असल्याच्या पोस्ट अनेक मराठी कलाकारांकडून करण्यात आल्या होत्या. मात्र, एखाद्यावर हात उचलणं हा ‘बिग बॉस’च्या घराचा सर्वात मोठा नियमभंग असल्याचं सांगत आर्याला ( Aarya Jadhao ) बाहेर काढण्यात आलं.
हेही वाचा : Bigg Boss Marathi : बिगबॉस सारखे शो प्रेक्षकांच्या मानसिकतेशी कसे खेळतात?
आर्याची आई झाली भावुक
आर्याने घराबाहेर काढल्यावर सोशल मीडियावर हार्टब्रेक इमोजी शेअर केला होता. तर, सोमवारी इन्स्टाग्राम लाइव्ह सेशन घेत तिने हा संपूर्ण घटनाक्रम चाहत्यांना सांगितला. तसेच या घटनेवर रॅप करत आर्याने तिचं रोखठोक मत मांडलं आहे. ‘बिग बॉस’मुळे आर्या एवढे दिवस तिच्या घरापासून दूर होती. पण, आता आर्या तिच्या घरी अमरावतीला परतली आहे.
‘बिग बॉस’मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असला तरीही, आर्याचं अमरावतीमध्ये मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. तिच्या गाडीच्या आजूबाजूला चाहत्यांनी गर्दी केली होती. यावेळी तिने चाहत्यांबरोबर सेल्फी काढले. शेवटी कुटुंबीयांना पाहताच आर्याने लगेच आईला मिठी मारली. लाडक्या लेकीला पाहून तिच्या आईला अश्रू अनावर झाले होते. आर्याच्या ( Aarya Jadhao ) सगळ्या चाहत्यांनी तिचं व तिच्या कुटुंबीयांचं उत्साहात स्वागत केलं.
हेही वाचा : Bigg Boss Marathi – Video : “मी कोणत्याही टीमचा…”, धनंजयने गेमच बदलला! निक्कीसमोर मांडलं स्पष्ट मत; काय आहे नवीन Strategy?
दरम्यान, लोकांनी दिलेल्या या भरभरून प्रेमाबद्दल आर्याने ( Aarya Jadhao ) इन्स्टाग्राम लाइव्ह सेशन घेत सोमवारी सर्वांचे आभार मानले. “मला ट्रॉफी नको, तुम्ही सगळे माझ्यासाठी ट्रॉफी आहात” असं आर्या यावेळी म्हणाली होती. सध्या तिचे सगळेच चाहते आणि प्रेक्षकवर्ग शो पाहून आर्याची आठवण काढत आहेत.