Aata Hou De Dhingaana 3 Grand Finale: ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ हा रिअॅलिटी शो प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करताना दिसतो. स्टार प्रवाह वाहिनीवर हा शो प्रदर्शित होतोय. त्यामध्ये स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांतले कलाकार सहभागी होतात. दोन वेगवेगळ्या मालिकांतील कलाकार एकत्र येतात. एकमेकांविरुद्ध विविध पद्धतीचे खेळ खेळतात. त्यामुळे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होताना दिसते.

महाअंतिम सोहळ्यात विजेत्या टीमला काय मिळणार?

आता होऊ दे धिंगाणा ३ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव करतो. त्याची एनर्जी सर्वांमध्ये उत्साह निर्माण करताना दिसते. या कार्यक्रमाचे हे तिसरे पर्व आहे. या पर्वात ठरलं तर मग, आई बाबा रिटायर होत आहेत, लग्नानंतर होईलच प्रेम, अशा सर्व मालिकांतील कलाकार सहभागी झालेले दिसले.

मालिकांमधून हे कलाकार त्यांच्या भूमिकेद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असतात. मात्र, आता ‘होऊ दे धिंगाणा’च्या सेटवर हे कलाकार वेगळ्या रूपात दिसतात. मजा-मस्ती करताना दिसतात. खेळ जिंकण्यासाठी त्यांच्यात चुरस पाहायला मिळते. साडे माडे शिंतोढे हा आता होऊ दे धिंगाणा या कार्यक्रमातील महत्त्वाचा भाग असल्याचे दिसते. त्यामध्ये एका कलाकाराला गाणे म्हणायचे असते. या गाण्यात काही रिकाम्या जागा असतात. त्या त्यांना भरायच्या असतात. जर त्यांनी त्या जागा चुकीच्या पद्धतीने भरल्या, तर त्यांच्या चेहऱ्यावर पाणी उडते. त्यामुळे हा खेळ पाहण्यास प्रेक्षकांना मजा येते.

आता आता होऊ दे धिंगाणा या शोचे हे तिसरे पर्व लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे आता अंतिम सोहळ्यात काय होणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर ‘आता होऊ दे धिंगाणा’चा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोत सिद्धार्थ जाधव म्हणतो, या महाअंतिम सोहळ्यात जी टीम जिंकेल, त्या टीमला हा मुकुट मिळणार आहे. त्यानंतर तो मुकुट दाखवताना दिसत आहे. या सीझनचे विजेते आहेत…, असे सिद्धार्थ म्हणत आहे. आता या महाअंतिम सोहळ्यात कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, स्टार प्रवाहवर शिट्टी वाजली रे हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचे सूत्रसंचालन अमेय वाघ करणार आहे. त्यामध्ये निक्की तांबोळी, रूपाली भोसले, गौतमी पाटील, माधुरी पवार, आशीष पाटील हे कलाकार सहभागी होणार आहेत.