‘बिग बॉस’ हिंदीचं १६ वं पर्व खूप चर्चेत राहिलं. विशेष म्हणजे या पर्वातील ‘मंडली’ची मैत्री सर्वाधिक गाजली. त्यांची मैत्री इतकी घट्ट होती की शोच्या अंतिम दोन स्पर्धक मंडलीचेच होते. शिव व स्टॅन हे टॉप २ सदस्य होते आणि रॅपर एमसी स्टॅनने हा शो जिंकला. तर, शिव दुसऱ्या क्रमांकावर राहिला. शो संपल्यानंतरही हे सर्वजण भेटतात, पार्टी करत असतात. पण आता अब्दु रोझिक आणि एमसी स्टॅनच्या मैत्रीत फूट पडल्याची माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“शो सोडणं हा…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून ओंकार भोजनेच्या एक्झिटवर वनिता खरातने मांडलं मत

शिव ठाकरे, अब्दू रोझिक, एमसी स्टेन, साजिद खान, निमृत कौर अहलुवालिया आणि सुंबुल तौकीर खान हे सहा जण या मंडलीचा भाग होते. पण आता स्टॅन अब्दूशी बोलत नाही, असं समोर आलंय. स्वतः अब्दुनेच त्याच्या एका व्हिडीओमध्ये खुलासा केला आहे.

एसएस राजामौली, राम चरण, ज्युनियर एनटीआर यांनी ऑस्कर एंट्रीसाठी प्रत्येकी २० लाख रुपये दिले? जाणून घ्या सत्य

व्हिडीओमध्ये अब्दू म्हणतो, माझ्या गाण्याला २३ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत, त्यामुळे गाण्याचे प्रमोशन करण्यासाठी मी एमसी स्टॅनला विचारण्याची गरज नाही. जेव्हा मी एमसी स्टॅनला कॉल करतो तेव्हा तो हाय किंवा सलाम म्हणत नाही, तो थेट कॉल डिस्कनेक्ट करतो. प्रत्येकजण येऊन मला एमसी स्टॅनबद्दल विचारतो. त्याच्याबद्दल मी कधी वाईट बोलेन असं तुम्हाला वाटतं का? बिग बॉसच्या घरात जेव्हा तो दु:खी असायचा, तेव्हा प्रत्येक वेळी मी त्याच्याबरोबर होतो. आता तो मीडियात म्हणत फिरतोय की मी त्याला माझ्या गाण्याचे प्रमोशन करायला सांगितलं. तो असं का करतोय, मला त्याचा मनस्ताप होत आहे. जेव्हा मी मीडियामध्ये बातम्या पाहिल्या तेव्हापासून मला राग आला आहे.”

नुकतीच रात्री शिव ठाकरेने एक पार्टी आयोजित करून त्या सर्वांची मैत्री कायम असल्याचं सांगितलं होतं. या पार्टीमध्ये साजिद खान, सुंबुल, अब्दू रोझिक, प्रतिक सहजपाल, सौंदर्या शर्मा, शिल्पा शिंदे, विशाल कोटियन देखील होते. दुसरीकडे, एमसी स्टॅन सध्या त्याच्या कॉन्सर्टमध्ये व्यग्र आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abdu rozik angry on mc stan says he do not receive calls hrc