‘बिग बॉस १६’ फेम अब्दु रोझिक व एमसी स्टॅनमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. अब्दु व स्टॅनमधील मैत्रीच्या नात्यात फूट पडल्याने बिग बॉसमधील मंडली तुटल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. स्टॅन माझ्याविरोधात अफवा पसरवत असल्याचा आरोप अब्दुने केला होता. त्याबरोबरच स्टॅन फोनही उचलत नसल्याचं अब्दुचं म्हणणं होतं. तर अब्दुने त्याच्या गाण्याचं प्रमोशन करण्यास सांगितल्याचं स्टॅन म्हणाला होता. या सर्व प्रकरणावर आता अब्दु रोझिकच्या टीमकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलं आहे.

अब्दुने या निवेदनातून एमसी स्टॅनच्या मॅनेजरवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. स्टॅनच्या मॅनेजरवर शिवीगाळ व कारचं नुकसान केल्याचा आरोप अब्दुच्या टीमकडून करण्यात आला आहे. “सर्वात आधी रमजानच्या शुभेच्छा देऊ इच्छितो. सगळ्यांना शांती व दयाळूपणासाठी प्रोत्साहित करण्याचा मानस आहे. पण तरीही रमजानच्या महिन्यात एमसी स्टॅन व अब्दु रोझिकमधील वादाचं खरं कारण समोर येणं गरजेचं होतं”, असं निवेदनात म्हटलं आहे.

court accepts report filed by eow against shiv sena leader ravindra waikar in Jogeshwari land scam mumbai
रवींद्र वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद; गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल न्यायालयाने स्वीकारला
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
young girl fight with ola auto viral video
“ये आदमी पागल है”, तरुणीने रिक्षाचालकाला केली शिवीगाळ अन्…, पुढे जे घडलं ते खतरनाक, पाहा VIDEO
Arunkumar Singh employee, Ashish Mittal,
अरुणकुमार सिंगच्या कर्मचाऱ्याकडून आशिष मित्तलला पैसे, कल्याणीनगर अपघात प्रकरण
Immediate relief, Nawab Malik, High Court,
नवाब मलिक यांना तूर्त दिलासा, मात्र….; वैद्यकीय जामिनावर असताना त्रासाविना प्रचार करत असल्याची उच्च न्यायालयाकडून दखल
Sanju Samson father Viswanath video viral
Sanju Samson : ‘३-४ लोकांमुळे माझ्या मुलाची १० वर्षें वाया गेली…’, संजू सॅमसनच्या वडिलांचे धोनी-विराटसह रोहित शर्मावर गंभीर आरोप, VIDEO व्हायरल
nawab malik
नवाब मलिक यांचा जामीन रद्द करा ,मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका; जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा दावा

हेही वाचा>> “खलिस्तानींना पाठिंबा देणाऱ्यांनी लक्षात ठेवा” कंगना रणौतने दिलेल्या ‘त्या’ इशाऱ्यावर प्रसिद्ध गायकाचं उत्तर, म्हणाला “माझं पंजाब…”

“११ मार्चला अब्दु व स्टॅन दोघेही बंगळूरमध्ये होते. अब्दूने स्टॅनच्या मॅनेजरला त्याच्या कॉन्सर्टमध्ये उपस्थित राहून त्याला पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, अब्दुबरोबर कॉन्सर्ट करण्यास स्टॅन इच्छुक नसल्याचं त्याच्या मॅनेजरने सांगतिलं. त्यानंतर अब्दुने तिकीट काढून स्टॅनच्या कॉन्सर्टला उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला. पण स्टॅनने त्याच्या मॅनेजरला अब्दुला बाहेर काढण्याबरोबरच त्याच्या कारचं पॅनल तोडून नुकसान करण्यास सांगितलं”, असंही निवेदनात म्हटलं आहे.

हेही वाचा>> Smriti Irani Birthday: एकेकाळी वेटरचं काम करायच्या स्मृती इराणी, मालिकेत काम मिळाल्यानंतर नशीबच बदललं; भाजपात प्रवेश केला अन्…

अब्दु व स्टॅनला काही म्युझिक कंपन्यांकडून एकत्र काम करण्यासाठी ऑफरही मिळाल्या होत्या. परंतु, स्टॅनने त्या नाकारल्या, असंही निवेदनात म्हटलं गेलं आहे. “अब्दुने स्टॅनच्या आईबरोबर फोटो न काढल्याने तो नाराज असल्याचं मंडलीमधील इतर सदस्यांनी सांगितलं होतं. पण, अब्दुने बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर स्टॅनच्या आईला कॉल केला होता. तो व्यवस्थित खेळत आहे, असं त्याने स्टॅनच्या आईला सांगितलं होतं”, असं अब्दुच्या टीमने सांगितलं आहे.

हेही वाचा>> Video: ढोलवादन, लेझीम अन्…; डोंबिवलीच्या शोभायात्रेत आकाश व सायलीचा जलवा, व्हिडीओ व्हायरल

abdu rozik statement

अब्दुच्या निवेदनात पुढे “स्टॅनची आई हिजाब परिधान करते आणि अब्दुने याचा कायम आदर केला आहे. त्याने कधीच कोणाबरोबरही फोटो काढण्यास नकार दिलेला नाही. फोटो काढण्यासाठी त्याला विचारण्यातच आलं नव्हतं. पण मुस्लीम भाऊ हे समजू शकणार नाही. अब्दुने स्टॅनला अनफॉलो केलं असं स्टॅनने मंडलीला सांगितलं होतं. पण अब्दुने स्टॅनला कधी फॉलोच केलं नव्हतं. बिग बॉसच्या घरात जाण्याआधी त्याचे ४ मिलियन फॉलोवर्स होते. तेव्हाही तो स्टॅनला फॉलो करत नव्हता. अब्दुच्या उंचीवरुन बॉडी शेमिंग करणाऱ्या आणि त्याची खिल्ली उडवणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो”, असं म्हणण्यात आलं आहे.