सध्या टेलिव्हिजन विश्वामध्ये ‘बिग बॉस हिंदी’च्या नव्या पर्वाची चर्चा आहे. काही आठवड्यांपूर्वी सुरु झालेल्या कार्यक्रमाचा आनंद प्रेक्षक घेत आहेत. सगळेजण दिवाळीचा आनंद घेत असताना यावर्षीची ‘बिग बॉस’च्या घरातली दिवाळी कशी असेल याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. तसेच ‘बिग बॉस’च्या घरातील सर्वात लोकप्रिय स्पर्धक अब्दू रोजिक दिवाळीत काय धमाल करतो ते पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अशातच अब्दूला ‘बिग बॉस’च्या घरात एक खास दिवाळी भेट मिळाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा : दिवाळीच्या दिवशीही जया बच्चन यांना संताप अनावर; नेटकरी म्हणाले, “मग संसदेतही…”

अलीकडेच, अब्दू रोजिकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. कलर्स टीव्हीने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अब्दू रोजिकचा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडीओत अब्दू रोजिक ‘बिग बॉस’च्या सोफ्यावर बसून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना दिसत होता. यासोबतच ‘बिग बॉस’ पाहण्याचे त्याने आवाहन केले. या व्हिडिओमध्ये तो म्हणतो, “मैं हूं छोटा पॅकेट, बडा धमाका. देखते राहो ‘बिग बॉस’.” हा व्हिडीओ शेअर करताना कलर्स त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “अब्दू रोजिककडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.”

पण अब्दूने इतक्या गोड शुभेच्छा दिल्यावर त्याची ही भारतातली पहिली दिवली खास व्हावी अशी चाहत्यांची इच्छा होती आणि तसेच झाले. ‘बिग बॉस’च्या घरात अब्दूला एक खास दिवाळी भेट देण्यात आली. यादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यात करण जोहर अब्दूला सांगतो की, “संपूर्ण देश त्याच्यावर खूप प्रेम करतो आणि तो इथे आमचा पाहुणा आहे, त्यामुळे त्याच्यासाठी एक खास भेट आहे.” करणने आधी अब्दूला मिठाई खायला दिली आणि नंतर त्याच्यासाठी त्याच्या उंचीचा एक खास सोफा सेट आणला. हा छोटा सोफा पाहून अब्दू अत्यंत खुश झाला. तसेच सोफा आणताच अब्दू लगेच त्यावर जाऊन बसला. त्यासोबतच करणने अब्दूला त्याच्या भारतातील चाहत्यांनी त्याच्यासाठी पाठवलेल्या शुभेच्छांचा एक व्हिडीओही दाखवला, तो पाहून अब्दू भारावून गेला.

हेही वाचा : Bigg Boss Marathi 4: किरण माने यांचे तेजस्विनीवर टीकास्त्र; म्हणाले, “तुला वाटतं…”

अब्दू रोजिक हा मुळ ताजिकिस्तानचा रहिवाशी असून तो अवघा १९ वर्षाचा आहे. अब्दू हा एक प्रसिद्ध गायक असून त्याची हिंदी गाणी इंस्टाग्राम व युट्युबवर व्हायरल होत असतात. अब्दू हा आपल्या गोंडस लुक मुळे व आवाजामुळे सोशल मीडिया सेन्सेशन ठरला आहे.