‘खुलता कळी खुलेना’, ‘तू तेव्हा तशी’, ‘तुला पाहता रे’ या मालिकांमुळे घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave). अभिनेत्रीने मराठीसह हिंदी कलाविश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिज्ञा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करीत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच आज अभिज्ञाचा वाढदिवस आहे, त्यामुळे तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अभिज्ञाच्या (Abhidnya Bhave) वाढदिवसानिमित्त तिची अनेक चाहते मंडळी तिला सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देत आहेत. तिच्यासाठी खास पोस्ट शेअर करत आहेत. अशातच सोशल मीडियावर अभिज्ञाच्या वाढदिवसानिमित्त एका पोस्टने लक्ष वेधलं आहे आणि ही पोस्ट तिचा नवरा मेहुल पैने (Mehul Pai) लिहिली आहे. मेहुलने बायकोच्या वाढदिवसानिमित्त तिच्याबरोबरचे खास फोटो शेअर केले आहेत आणि तिला हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

मेहुलने (Mehul Pai) अभिज्ञाबरोबरचे (Abhidnya Bhave) फोटो शेअर करत असं म्हटलं आहे की, “हाय, ही आहे अभिज्ञा. अभिज्ञा एक गोड, वेडी, खूप प्रेमळ, हुशार आणि अतिशय मेहनती मुलगी आहे. त्यात तिचे लग्न मेहुलशी झाले आणि ती आणखीन हुशार झाली आहे आणि आता ती एक उत्तम आणि आनंदी आयुष्य जगते आहे. अभिज्ञासारखे बना आणि हा… आज तिचा वाढदिवस आहे, त्यामुळे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”

मेहुलची (Mehul Pai) ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी त्याने लिहिलेल्या कॅप्शनबद्दल कौतुक केलं आहे. त्याचबरोबर या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अभिज्ञाच्या अनेक चाहत्यांनीही तिला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. ऋतुजा बागवे, स्वप्नील जोशी व तनिष्का विशे या कलाकारांनीही तिला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, अभिज्ञाने (Abhidnya Bhave) जानेवारी २०२१ मध्ये मेहुल पैशी (Mehul Pai) लग्नगाठ बांधली. दोघे सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. मेहुलच्या कर्करोगाच्या निदानादरम्यान त्याला अभिज्ञाने खंबीर साथ दिली होती. त्या सगळ्या दिवसांचे अनुभव तिनं वेळोवेळी पोस्टमधून मांडले होते. तिच्या धैर्याचं चाहत्यांनी कौतुकदेखील केलं होतं.

Story img Loader