Abhidnya bhave Anniversary Post : ‘तू तेव्हा तशी’ मधली ‘वल्ली’ असो किंवा ‘खुलता कळी खुलेना’ मधली ‘मोनिका’ छोट्या पडद्यावरची लोकप्रिय खलनायिका म्हणून अभिज्ञा भावेला ओळखलं जातं. तिने आजवर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय अभिनेत्री तिच्या सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. वैयक्तिक आयुष्यातल्या देखील अनेक गोष्टी अभिज्ञा आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिज्ञाने जानेवारी २०२१ मध्ये मेहुल पैशी लग्नगाठ बांधली. या जोडप्याची पहिली भेट कॉलेजमध्ये असताना झाली होती. दोघांचा कॉमन ग्रुप होता. सुरुवातीला हे दोघंही फारसं बोलायचे नाहीत. पण, त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. अभिज्ञाला सुरुवातीला मेहुलला खूपच अहंकार आहे असं वाटायचं पण, त्यानंतर माणूस म्हणून तो खूपच वेगळा आहे याची जाणीव अभिनेत्रीला झाली. या दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन अभिज्ञा आणि मेहुल यांनी ६ जानेवारी २०२१ रोजी लग्नगाठ बांधली. आज अभिनेत्रीच्या लग्नाचा चौथा वाढदिवस आहे. यानिमित्ताने खास पोस्ट लिहित अभिज्ञाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अभिज्ञा पोस्ट शेअर करत लिहिते, “मी असं ऐकलंय… जेव्हा तुम्ही योग्य व्यक्तीच्या प्रेमात पडता, तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीच्या रोज नव्याने प्रेमात पडता. याचा नेमका अर्थ मला तुझ्यामुळे समजला…. Happiest Anniversary माय सर्वस्व पै. तुला चांगलं आरोग्य लाभो…आणि देव तुझ्या सदैव पाठिशी राहो. कारण, बाकीच्या गोष्टींसाठी मैं हूँ ना” या पोस्टबरोबर अभिनेत्री नवऱ्यासह काही रोमँटिक फोटो देखील शेअर केले आहेत.

अभिनेत्रीच्या या रोमँटिक पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. रेश्मा शिंदेने अभिज्ञा आणि मेहुल यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना “Happiest Anniversary माऊ आणि अन्ना” असं म्हटलं आहे. याशिवाय सायली संजीव, सुकन्या मोने, अमृता बने, अभिषेक राहाळकर यांनी देखील या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, अभिज्ञा भावेच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर आजवर तिने ‘लगोरी’, ‘खुलता कळी खुलेना’, ‘तू तेव्हा तशी’, ‘तुला पाहता रे’, ‘रंग माझा वेगळा’ अशा विविध मालिकांमध्ये काम केलेलं आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी ती ‘बातें कुछ अनकही सी’ या हिंदी मालिकेत सुद्धा झळकली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhidnya bhave shares romantic post for husband mehul pai on the occasion of wedding anniversary sva 00