मराठीसह हिंदी मालिकाविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिज्ञा भावे ( Abhidnya bhave ). कधी नायिका तर कधी खलनायिकेच्या भूमिकेत झळकलेल्या अभिज्ञाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. ‘तुला पाहते रे’मधील मायरा असो किंवा ‘तू तेव्हा तशी’ मालिकेतील पुष्पवली असो तिच्या या भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. अशा या सुंदर अभिनेत्रीने नुकतीच आजीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे; जी सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या ( Abhidnya bhave ) आजीचं निधन होऊन आज वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने अभिज्ञाने आजीची साडी नेसली आहे. याचे फोटो तिने शेअर करत आजीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

हेही वाचा – “आज जर तुम्ही असता तर…”, लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणावर आनंद दिघेंची आठवण काढत मराठी अभिनेत्याची उद्विग्न पोस्ट

तुझ्यावर कायम प्रेम करेन – अभिज्ञा भावे

अभिज्ञाने ( Abhidnya bhave ) आजीच्या आठवणीत लिहिलं आहे, “वर्षभरानंतरही तू स्मरणात आहेस, ही आनंददायी बाब आहे. या जगात तुला सर्वात जास्त जे आवडतं ते परिधान केलं…तुझी आवडती साडी…आनंददायी आठवणींसाठी तुझे आभार. तुझ्यावर कायम प्रेम करेन…आमच्यावर कायम लक्ष राहूदे प्रमिला.”

हेही वाचा – Bigg Boss Marathi : लोकांना छळू नको म्हणत डीपीने खास अंदाजात निक्कीला वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा, पाहा व्हिडीओ

अभिज्ञा भावेच्या ( Abhidnya bhave ) या पोस्टवर कलाकार मंडळींसह तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहे. अभिज्ञाची खास मैत्रीण अभिनेत्री मयुरी देशमुखने लिहिलं आहे, “भावे किती सुंदर आहेस.” तर अभिनेत्री सुखदा खांडेकरने लिहिलं आहे, “तिची आठवण ठेवण्याची ही खूपच मस्त पद्धत आहे. अभी तू एक खूप छान माणूस आहेस.” तसंच रेश्मा शिंदेने लिहिलं की, अभी आणि पूर्ण हार्टचे इमोजी दिले आहेत. याशिवाय अभिनेता आशुतोष गोखले, सायली संजीव, नम्रता संभेराव, अभिषेक रहाळकर, स्वप्नील जोशी, सायली साळुंखे अशा अनेक कलाकारांनी अभिज्ञा भावेच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: कोणी लाथाडली भांडी, तर कोणी…, इरिनावरून निक्की आणि वैभवमध्ये कडाक्याची भांडणं; पाहा प्रोमो

दरम्यान, अभिज्ञा ( Abhidnya bhave ) सध्या कुठल्याही मालिकेत दिसत नसली तरी ती सोशल मीडियावरील पोस्टमुळे कायम चर्चेत असते. सुंदर फोटो, व्हिडीओ शेअर करून अभिज्ञा चाहत्यांच्या संपर्कात असते. काही महिन्यांपूर्वी ती नवऱ्याबरोबर काश्मिरला फिरायला गेली होती. तिच्या या काश्मिर ट्रीपचे फोटो, व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhidnya bhave wore her grandmothers saree and shares emotional post pps