सध्या ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका चांगलीच गाजतेय. या मालिकेतील सगळ्याच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. सौरभ आणि अनामिकाप्रमाणेच या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या वल्लीलाही प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत. मालिकेत जरी अनामिका आणि वल्ली यांचा एकमेकांशी अजिबात पटत नाही असं दाखवत असले तरीही खऱ्या आयुष्यात मात्र त्या दोघी खूप घट्ट मैत्रिणी झाल्या आहेत. आता वल्लीने अनामिकासाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहित तिच्याबद्दलचं प्रेम व्यक्त केलं आहे.

अनामिकाची भूमिका साकारणारी शिल्पा तुळसकर आणि वल्ली ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिज्ञा भावे यांच्यात या मालिकेमुळे खूप घट्ट बॉण्डिंग तयार झालं आहे. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारी अभिज्ञा तिच्या पोस्टमधून आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असते. तसंच बऱ्याचदा ती कलाकारांमधल्या ऑफस्क्रीन गमतीजमती चाहत्यांसमोर आणत असते. आता तिने शिल्पा तुळसकरसाठी एक खास पोस्ट केली आहे.

Milind Gawali
“कलाकारांनी एकतर लग्नच करू नये…”, मिलिंद गवळी असं का म्हणाले?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Mahesh Manjrekar
“प्रेक्षकांना नेहमी…” महेश मांजरेकर यांना नवीन कलाकारांविषयी काय वाटतं? म्हणाले, “मला कौतुक…”
marathi singer vaishali samant
“मराठी कलाकारांना PF नाही, पेन्शन नाही…”, वैशाली सामंतने खंत व्यक्त करत केली ‘ही’ मागणी, म्हणाली…
Marathi actress Prajakta Mali Praised to thet tumchya gharatun drama
“थेट तुमच्या काळजाला हात घालतं…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधल्या कलाकारांच्या ‘या’ नाटकाचं प्राजक्ता माळीने केलं कौतुक, म्हणाली, “ओंकारचं गाणं…”
Tejaswini Pandit
“माझ्या बालमित्राने मला…”, सुंदर साडीतील फोटोंमध्ये तेजस्विनी पंडितची खास पोस्ट; म्हणाली, “माझं न संपणारं प्रेम…”
r madhavan on six pack abs
“माझ्याकडे सिक्स पॅक्स नाहीत, मला डान्सही येत नाही तरीही…”; २५ वर्षे सिनेसृष्टीत काम करणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्याचं वक्तव्य चर्चेत
Marathi actress Tejashri Pradhan talk about social media
“फक्त हे मृगजळासारखं…”, सोशल मीडियाबाबत तेजश्री प्रधानने मांडलं मत; तरुणपिढीला सल्ला देत म्हणाली, “आपण आयुष्यात…”

आणखी वाचा : स्वप्निल जोशी ‘तू तेव्हा तशी’ मालिकेच्या एका भागासाठी आकारतो ‘इतके’ मानधन, किंमत ऐकून व्हाल थक्क

अभिज्ञाने तिचे आणि शिल्पाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलं, “तू माझ्या आई सारखीच आहेस हे म्हणायला मला फार वेळ लागला. माझ्या आयुष्यातील सगळ्यात जवळची व्यक्ती होणं हे खूप अनपेक्षित आहे. माझ्या आयुष्यातल्या या वळणावर मला माझ्याभोवती तुझ्यासारख्या व्यक्तीची खूप गरज होती. थँक यू मला खूप गरज असताना तू मारलेल्या त्या प्रेमळ मिठींसाठी, थँक यू माझे विचार ठिकाणावर आणण्यासाठी, थँक यू मला कोणीतरी व्यक्ती माझ्याजवळ हवी आहे हे मी न सांगताच ते ओळखून माझ्याबरोबर राहण्यासाठी, थँक यू मला तुझ्या घरात, वोर्डरोबमध्ये आणि हृदयात स्थान देण्यासाठी.”

हेही वाचा : “मला लग्नात मुहूर्ताच्या वेळी…” पाठकबाईंची अनेक वर्षांपासूनची इच्छा झाली पूर्ण, अक्षया देवधरची पोस्ट चर्चेत

पुढे तिने लिहिलं, “रोज मला सकारात्मक ऊर्जा देण्यासाठी, माझे लाड करण्यासाठी थँक यू. मी कदाचित हे दाखवणार नाही पण, आज मी जेव्हा मागे वळून बघते तेव्हा मला या सगळ्याची गरज होती हे मला जाणवतं. देवाने तुझ्यासाठी व्यक्ती बनवणं बंद केलंय बहुदा. पण तू माझ्या आयुष्यात आहेस यासाठी मी स्वतःला नशीबवान समजते. ही पोस्ट वाचून तुझ्या अपेक्षा तू वाढवू नकोस. मी सेटवर तुझ्याशी तशीच वागणार आहे जशी मी आतापर्यंत वागत आले आहे.” अभिज्ञाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय.

Story img Loader