Maharashtra Assembly Elections 2024: विधानसभा निवडणुकांना अवघे काही दिवस उरले आहेत. राज्यातील राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करत आहेत. अशातच ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिजीत बिचुकलेंनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं जाहीर केलं आहे. बिचुकलेंनी ते कोणत्या मतदारसंघातून अर्ज करणार त्याबद्दल सांगितलं आहे.

अभिजीत बिचुकले सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघातून आमदार शिवेंद्रराजे भोसलेंच्या (Shivendra Raje Bhosale) विरोधात निवडणूक लढवणार आहेत. २०१९ मध्ये अभिजीत बिचुकले यांनी मुंबईतील वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढवली होती. तेव्हाचा उल्लेख करत बिचुकले म्हणाले, “२०१९ साली मी एक प्रयोग केला होता. वरळीमधून आदित्य ठाकरेंविरोधात माझी लढत झाली होती. परंतु माझ्या मातृभूमीमध्ये सातारा-जावळी मतदारसंघातील संपूर्ण मतदारांना माझ्या रुपाने मी एक सुवर्णसंधी देतोय. २००४, २००९, २०१४ आणि आता २०२४ ला मी पुन्हा निवडणूक लढवतोय. लोकांच्या विकासासाठी याठिकाणी विद्यमान आमदार आणि माझी लढत लोकांना बघायला मिळेल. इथे महाविकास आघाडीकडून कोणता उमेदवार येईल याबाबत मला माहीत नाही. तुम्ही मतदारांना ज्या प्रमाणे एकदा उदयनराजेंचा साताऱ्यातून पराभव केला होता, त्याच पद्धतीने माझा विजय करा.”

18 against former corporator MLA Anna Bansode Pimpri Assembly Constituency
पिंपरी विधानसभा: १८ माजी नगरसेवक विरोधात गेल्यास अण्णा बनसोडे म्हणाले, अजित पवार जो निर्णय…
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
hitendra thakur to contest assembly election again to save bahujan vikas aghadi
विश्लेषण : हितेंद्र ठाकूर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात का उतरले? बविआला वाचवण्याची धडपड?
adv Wamanrao Chatap
शेतकरी संघटनेचे अ‍ॅड. वामनराव चटप आठव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात
Palghar Vidhan Sabha News
Palghar Assembly constituency : पालघर विधानसभा मतदारसंघ १० वर्षांपासून शिवसेनेकडे, येत्या निवडणुकीत काय होणार?
bhokar constituency
भोकर विधानसभा मतदारसंघ : काँग्रेस अशोक चव्हाणांशिवाय गड राखणार? की भाजपा पहिला विजय साजरा करणार?
Yamini Jadhav Byculla Assembly Election 2024 in Marathi
Byculla Assembly Constituency : विधानसभेला भायखळा मतदारसंघात कोण बाजी मारणार? महाविकास आघाडी की महायुती?
Colaba Vidhan Sabha Constituency
Colaba Vidhan Sabha Constituency : कुलाबा मतदारसंघावर कुणाचा झेंडा फडकणार? मविआ की महायुती? काय आहे राजकीय समीकरण?

हेही वाचा – अखेर ७ वर्षांनी वाद मिटला! जखमी गोविंदाची भाचा कृष्णा अभिषेकने घेतली भेट; म्हणाला, “मामींना भेटण्याची भीती…”

तिकिटासाठी कोणत्याही पक्षाच्या मागे फिरत नाही – अभिजीत बिचुकले

पुढे ते म्हणाले, “मला निवडून दिल्यास मी २८७ आमदारांमुळे या साताऱ्याचा ठसा उमटवल्याशिवाय मी राहणार नाही, कारण मी कुणाच्या पाठीमागे फिरत नाही, कारण माझी स्वतंत्र विचारसरणी आहे, माझे स्वतंत्र एथिक्स आहेत, माझी स्वतंत्र संकल्पना, कल्पना आहे. मी तिकिटासाठी कोणत्याही पक्षाच्या मागे फिरत नाही.”

हेही वाचा – हृतिक रोशनच्या पहिल्याच चित्रपटाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये का झाली होती? ‘हे’ आहे कारण…

साताऱ्याच्या विकासाबद्दल बिचुकले म्हणाले…

साताऱ्याच्या विकासाबद्दल टीव्ही ९ शी बोलताना अभिजीत बिचुकले म्हणाले, “हे दोन्ही राजे फक्त भांडत राहिले, कार्यकर्ते डोके फोडत राहिले, यांच्या मनात आलं की यांनी मनोमिलन करायचं, यांच्या मनात आलं की सोईचं राजकारण करून नगरपालिकेत विभक्त व्हायचं. एमआयडीसी बंद आहे, सर्व सामान्यांनी काय करायचं सांगा.”

हेही वाचा – २६ मतदारसंघांत ‘शिवसेना विरुद्ध शिवसेना’ सामना रंगणार! ठाकरे-शिंदेंकडून उमेदवारांच्या पहिल्या याद्या जाहीर

दरम्यान, अभिजीत बिचुकले यांनी यंदाची लोकसभा निवडणूक दोन मतदारसंघातून लढवली होती. सातारा आणि कल्याण-डोंबिवली या मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते मात्र त्यांचा पराभव झाला होता. आता विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रराजेंविरोधात अभिजीत बिचुकले निवडणूक लढवणार आहेत.