‘झी मराठी’वरील बहुचर्चित ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाचा तिसरा सीझन चांगलाच चर्चेत आहे. राजकीय नेते आणि कलाकारांच्या मुलाखतीमुळे हा कार्यक्रम आणखी रंगदार झाला आहे. मागच्या आठवड्यात या कार्यक्रमात मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकरने हजेरी लावली होती. आता येत्या भागामध्ये बिग बॉस मराठीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले अभिजीत बिचुकले सहभागी होणार आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’च्या या नवा भागाचा प्रोमो नुकताच झी मराठीच्या सोशल मीडियावर पेजवर शेअर करण्यात आला आहे.
हेही वाचा – “…यामुळे पहिल्याच टेकमध्ये दहीहंडी फोडू शकले”; ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने सांगितला किस्सा
या प्रोमोमध्ये अभिजीत बिचुकले स्वतःच्या इंग्रजीचं कौतुक करताना दिसत आहेत. बिचुकले म्हणतात की, “मी इंग्रजी असं बोलतो ना की, मी बोललेले शब्द डिक्शनरीमध्ये कुठे लिहीले आहेत हे कळणार नाही.” त्यानंतर ते काही वाक्य इंग्रजीमध्ये बोलतात. हे ऐकून अवधूत गुप्ते म्हणतो की, “एवढं फाडफाड इंग्रजी बोलायला लागलात की, मला आता कौतुकाने काय करावं हेच कळतं नाहीये.”
याचा अर्थ ‘खुपते तिथे गुप्ते’च्या येत्या भागात अभिजीत बिचुकले यांचं जबरदस्त इंग्रजी ऐकायला मिळणार आहे. तसेच अवधूत गुप्तेच्या धारदार प्रश्नांना उत्तरं कशाप्रकारे बिचुकले देतायत हे देखील पाहणं उत्सुकतेच असणार आहे.
हेही वाचा – Video: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत तेजश्री प्रधानला दिलंय ‘हे’ भन्नाट नाव; जाणून घ्या
हेही वाचा – ‘रमा राघव’ या मालिकेतून ‘या’ अभिनेत्रीची एक्झिट; व्हिडीओ शेअर करत सांगितलं कारण
दरम्यान, ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमामध्ये यापूर्वी जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, सुबोध भावे, श्रेयस तळपदे या कलाकारांनी हजेरी लावली होती. शिवाय राज ठाकरे, संजय राऊत, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, अमोल कोल्हे हे देखील सहभागी झाले होते.