Marathi Actor Abhijeet Kelkar Post For Devendra Fadnavis : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आता हळुहळू समोर येत आहेत. जे काही पहिले कल हाती आलेत त्यानुसार महायुतीने २०० हून अधिक जागांवर आघाडी घेतल्याचं समोर आलं आहे. तर, नागपूर दक्षिण- पश्चिममधून सुद्धा मोठी बातमी समोर आली आहे. या मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस विजयी झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवेंद्र फडणवीसांवर सध्या सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. त्यांचा १२ हजारांहून अधिक मतांनी विजय झाला आहे. या निकालावर राजकीय क्षेत्रातील दिग्गजांसह मराठी मनोरंजन विश्वातील कलाकार सुद्धा व्यक्त होऊ लागले आहेत.

हेही वाचा : Video : शत्रूच्या ‘त्या’ बोलण्यानं सूर्याच्या कुटुंबाला आलं टेन्शन; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत पुढे काय घडणार? पाहा प्रोमो

u

नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांतून घराघरांत लोकप्रिय झालेला मराठी अभिनेता अभिजीत केळकरने काही महिन्यांपूर्वीच भाजपामध्ये प्रवेश केला होता. यानंतर अभिनेता राजकीय तसेच सामाजिक विषयांवर नेहमीच आपली स्पष्ट मतं मांडताना दिसला. आता देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर अभिजीत केळकरने शेअर केलेली पोस्ट सर्वत्र चर्चेत आली आहे.

अभिनेता अभिजीत केळकरची पोस्ट

“असंख्य काजव्यांच्या एकत्र येण्याने रात्रीचा काळोख कमी होत नाही, पौर्णिमेचा चंद्र जरी सौम्य असला तरी रात्र प्रकाशमय केल्याशिवाय राहत नाही. धुरळा उडाला, सूर्य पुन्हा एकदा तळपला…देवेंद्र फडणवीस आपलं मनापासून त्रिवार अभिनंदन” अशी पोस्ट शेअर करत अभिजीतने देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : भुवनेश्वरी की चारुलता? भर मांडवात अक्षरा लग्न थांबवणार; अधिपतीच्या डोक्यावर हात ठेवून…; पाहा मालिकेचा प्रोमो

दरम्यान, अभिजीत केळकरप्रमाणे मेघा धाडे, प्रसाद ओक, उत्कर्ष शिंदे अशा मराठी कलाकारांनी देखील या निकालांवर भाष्य केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhijeet kelkar marathi actor congratulate devendra fadnavis for election victory shared post sva 00