Abhijeet Kelkar : मुंबईत प्रवास करणं सगळ्यात जास्त सोयीस्कर मानलं जातं. रेल्वे, बस, रिक्षा, टॅक्सी… एकंदर काय तर मुंबईकरांची गाडी चोवीस तास धावत असते. मात्र, गेल्या दिवसांपासून दैनंदिन प्रवास करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोडींचा सामना करावा लागत आहे. याचा फटका केवळ सर्वसामान्य नागरिकांना नव्हे तर आता सेलिब्रिटींना देखील बसत आहे. याआधी ठाण्यात होणाऱ्या ट्राफिक संदर्भात ऐश्वर्या नारकर, अपूर्वा नेमळेकर या कलाकारांनी पोस्ट शेअर करत यावर तोडगा काढण्याची मागणी केली होती. आज आणखी एका मराठी अभिनेत्याने या वाहतूक कोंडी संदर्भात संतप्त पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे.

घोडबंदर मार्गावरून प्रवास करणाऱ्या अभिजीत केळकरने ( Abhijeet Kelkar ) संतापजनक पोस्ट शेअर करत गेल्या दीड तासांपासून एकाच ठिकाणी वाहतूक कोंडीत अडकल्याचं सांगितलं आहे. मालिकेच्या शूटिंगसाठी आता अभिनेत्याला रोज या मार्गाने प्रवास करावा लागत आहे. दोन दिवसांआधीच अभिजीतने हा वाहतूक कोंडीचा मुद्दा सोशल मीडियावर उपस्थित केला होता. आता पुन्हा एकदा असाच एकदा अनुभव आल्याने अभिजीतने संतापजनक पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
TRAGIC! Hyderabad Youth Falls Off 3rd Floor Of Hotel Building While Trying To Shoo Away Dog
मृत्यू आपल्याला कसा जाळ्यात ओढतो पाहा; तरुणाच्या मृत्यूचा थरारक VIDEO बघून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
neha gadre marathi actress announces pregnancy
इंडस्ट्री सोडून विदेशात झाली स्थायिक; ‘ही’ मराठी अभिनेत्री लग्नानंतर ५ वर्षांनी होणार आई! बाळाच्या जन्माआधी केलं जेंडर रिव्हिल
Priya bapat sings kajra mohabbat wala 56 years old song
प्रिया बापटने गायलं ५६ वर्षांपूर्वीचं सुपरहिट बॉलीवूड गाणं! सुमधूर आवाजाचं सर्वत्र होतंय कौतुक, नेटकरी म्हणाले, “अप्रतिम…”
bigg boss marathi dhananjay powar share netizen post
“निक्की-अरबाजचे फालतू चाळे तासभर TV वर दाखवून…”, Bigg Boss फेम धनंजय पोवारने शेअर केलेली पोस्ट चर्चेत
female police officer nearly kisses womans lips video viral
ऑन ड्युटी महिला पोलिस अधिकाऱ्याने मर्यादा ओलांडली, मान धरली, किस केलं अन्…; लज्जास्पद Video व्हायरल
what prithvik pratap wife prajakta vaikul do
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची पत्नी काय काम करते? प्राजक्ताचे शिक्षण किती? म्हणाली, “मी ९ वर्षांपासून…”

हेही वाचा : अखेर ७ वर्षांनी वाद मिटला! जखमी गोविंदाची भाचा कृष्णा अभिषेकने घेतली भेट; म्हणाला, “मामींना भेटण्याची भीती…”

u

u

अभिजीत केळकर काय म्हणाला?

“आज शूटिंगचा साडेआठचा कॉलटाइम होता साडेसात वाजता घरून गुगल मॅप बघून निघालेला मी गेल्या दीड तासांपासून घोडबंदर रोडवरच्या घाटाच्या ही बराच आधी असलेल्या शेल पेट्रोल पंपच्या इकडे बंपर टू बंपर ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे. ट्राफिक कधी सुटणार शूटिंगला आपण कधी पोहोचू शकणार हे माहीत नाही. या केऑटिक सिच्युएशन मध्ये घाणेरड्या रस्त्यांमुळे आणि बेशिस्त ट्रक ड्रायव्हर्समुळे, एखादा ट्रक किंवा ट्रॉलर उलटून त्याच्या खाली माझा मृत्यू झालाच आणि माझ्या पश्चात त्या स्पॉटला चुकून माकून माझं नाव द्यायचा विचार झालाच तर माझा उल्लेख, “अभिनेता” अभिजीत केळकर असा न करता “चांद्र मोहीम वीर” अभिजीत केळकर असा करावा ही विनंती…”

Abhijeet Kelkar
अभिजीत केळकरची पोस्ट ( Abhijeet Kelkar )

हेही वाचा : हृतिक रोशनच्या पहिल्याच चित्रपटाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये का झाली होती? ‘हे’ आहे कारण…

y

u

दरम्यान, अभिजीतच्या ( Abhijeet Kelkar ) पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील सहमती दर्शवत कमेंटमध्येही संतापजनक भावना व्यक्त केल्या आहेत. “मुंबईत सगळीकडे अशीच परिस्थिती आहे”, “खरंच खूप खराब रस्ते आहेत”, “अभिजीत अरे काळजी घे…असलं काही बोलू नकोस”, “अजून २ वर्षे तरी या घोडबंदर मार्गाने प्रवास करू नये” अशा प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी देखील घोडबंदर मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर आपली मतं मांडली आहेत.

Story img Loader